मुंबई- महाराष्ट्रात नवीन समीकरण उदयास आलेले आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या 29 व्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी शिवाजी पार्कवर भव्यदिव्य तयारी करण्यात आलेली आहे. मैदानावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. हे व्यासपीठ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांना साजेसे असणार आहे. ही सर्व तयारी कला दिग्दर्शक नितीन सरदेसाई यांनी केली आहे. त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...
उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात...पाहा सेट - ई टीव्ही भारत मुलाखत कला दिग्दर्शक नितीन सरदेसाई
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी शिवाजी पार्कवर शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
ई टीव्ही भारत मुलाखत कला दिग्दर्शक नितीन सरदेसाई
हेही वाचा -महाराष्ट्राला दुसऱ्यांदा मिळणार मुंबईचा मुख्यमंत्री; दोन्ही शिवसेनेचेच
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी शिवाजी पार्कवर शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्याआधीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी अनेक दिग्ग्जांसह राज्यातील अनेक कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत.
Last Updated : Nov 28, 2019, 2:04 PM IST