मुंबई- राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील घडामोडींचा थोडक्यात आढावा.
थोडक्यात महत्त्वाचे…
मुंबईत रविवारी कोरोनाचे 1 हजार 105 नवे रुग्ण
मुंबईत रविवारी 1 हजार 105 नवे रुग्ण आढळले असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 393 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा एकुण आकडा 1 लाख 16 हजार 451 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 6 हजार 444 वर पोहचला आहे. आतापर्यंत एकूण 88 हजार 299 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या मुंबईत 21 हजार 412 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 76 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 78 दिवसांवर पोहचला आहे.
नागपूरात कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 897 वर
राज्याची उपराजधानी नागपूरात कोरोनाचा धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. रविवारी दिवसभरात २३५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ५८९७ इतकी झाली आहे. यामध्ये १०८ रुग्ण हे नागपूर जिल्ह्या बाहेरील आहेत. तर १८३९ रुग्ण नागपूर ग्रामीणच्या विविध तालुक्यातील आहेत आणि ४०५८ रुग्ण नागपूर शहरातील आहेत. सध्या नागपुरातील २२ ठिकाणी १९६७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपूरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६१.३० टक्के इतके आहे,तर मृत्यू दर हा २ ५७ इतका आहे
यवतमाळ जिल्ह्यात 455 रुग्णांवर उपचार सुरू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 61 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात नव्याने 30 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात शनिवारपर्यंत 425 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण होते. यात रविवारी 30 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 455 वर पोहचला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 61 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 394 आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1145 झाली आहे. यापैकी 722 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 29 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 115 जण भरती आहे.
जळगावात रविवारी विक्रमी 365 रुग्णांची नोंद
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग कायम आहे. रविवारी जिल्ह्यात विक्रमी 365 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. धक्कादायक बाब म्हणजे, रविवारी एकाच दिवशी 13 रुग्णांचा उपचार सुरू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 11 हजार 753 इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक 92 रुग्ण हे जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात आढळले आहेत. त्याचप्रमाणे, जळगाव ग्रामीण 29, भुसावळ 28, अमळनेर 29, चोपडा 45, पाचोरा 30, भडगाव 15, धरणगाव 7, यावल 7, एरंडोल 4, जामनेर 16, रावेर 15, पारोळा 8, चाळीसगाव 34, बोदवड 5 तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील 1 असे एकूण 365 रुग्ण नव्याने समोर आले आहेत.
भंडारा जिल्ह्यात 16 रुग्णांची भर
भंडारा जिल्ह्यत आज 16 व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 7, साकोली 2, तुमसर 3, मोहाडी 1, पवनी 1 तर लाखनी तालुक्यातील 2 व्यक्तीचा समावेश आहे. 16 पैकी 15 रुग्ण हे कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले रुग्ण आहेत. भंडारा जिल्ह्यातील सनफ्लॅग स्टील कंपनीत कोरोनाचा शिरकाव झाला असून एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कंपनीतील इतर कामगारांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे.
नांदेडमध्ये रविवारी 14 रुग्ण झाले पुर्णपणे बरे
जिल्ह्यात कोरोनामुळे अतिगंभीर आजारी असलेल्या 14 रुग्णांवर यशस्वी औषधोपचार करुन बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात 60 वर्षापेक्षा अधिक अशा रुग्णांचा समावेश आहे. यातील एक 72 वर्षीय वयोवृद्ध 12 दिवस व्हेंटिलेटरवर राहून 33 दिवसानंतर मृत्यूशी जिंकून आता बरे होऊन घरी जात असल्याचे आम्हा सर्व टिमला आनंद असल्याचे ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी 871 बाधित रुग्णांची नोंद,797 जण कोरोनामुक्त
पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी दिवसभरात 871 जण कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 8 जनांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, रविवार 797 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 22 हजार 934 वर पोहचली असून पैकी, 15 हजार 479 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयातील सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 704 एवढी आहे. संबंधित रुग्णांवर कोविड सेंटर आणि महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मीरा भाईंदरमध्ये १४९ कोरोनाबधित वाढले, १४६ रुग्ण कोरोनामुक्त!
मीरा भाईंदरमध्ये एकाच दिवशी कोरोना मुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४९ जणांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
आला आहे. त्यामुळे १४९ नवीन रुगणांची भर पडली आहे. १४६ जणांनी आज कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत मीरा भाईंदर कार्यक्षेत्रात २६२१९ जणांची कोविड १९ ची चाचणी करण्यात आली यामध्ये १६ हजार ९९९ जणांचा वैद्यकीय अहवाल नकारात्मक आलं आहे. तर ८ हजार ४६३ जणांचा कोरोनाची बाधा झाल्याचा आढळून आले आहे. ७५७ जणांचा वैद्यकीय अहवाल प्रतीक्षेत आहे. तर १ हजार ३६० जणांवर मीरा भाईंदर शहरातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासांत १२४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळूले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालघरमध्ये आढळले १२४ कोरोना रुग्ण