मुंबई- अनेकजण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येत असतात. मात्र, सर्वांचेच स्वप्न पूर्ण होतात असे नाही. फाळणीच्यावेळी पाकिस्तानमधून आलेले मोहनदास भगनानी व्यवसायाच्या शोधात मुंबईत आले. बांद्रा येथील एल्को बाजारपेठेत त्यांनी पाणीपुरीचा छोटाव्यवसाय सुरू केला. आज हा व्यवसाय मोठा झाला आहे. या छोट्याशा व्यवसायाचे रूपांतर आता मोठ्या रेस्टॉरंटमध्ये झाले आहे. त्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...
हेही वाचा -शिवरायांच्या जयंतीचा वाद थांबविणे गरजेचे - शिवेंद्रराजे भोसले
मुंबई ही स्वप्ननगरी समजली जाते. अनेकजण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत पाऊल ठेवतात. मात्र, प्रत्येकाच्या स्वप्नाला दिशा मिळते असे नाही. मात्र, याला मोहनदास भगनानी हे अपवाद ठरले आहेत. मोहनदास यांनी मुंबईत बांद्रा येथे स्वतःचा पाणीपुरीचा 1975 साली व्यवसाय सुरू केला. यावेळी त्यांचे दुकान हे छोटासा स्टॉल होता. मात्र, आज 45 वर्षानंतर त्यांच्या स्टॉलचे रूपांतर हे मोठ्या रेस्टॉरंटमध्ये झाले आहे. 'एल्को' असे त्या रेस्टॉरंटचे नाव आहे.