मुंबई- 'व्हॉट्सअॅप'च्या माध्यमातून भारतातील काही पत्रकार आणि मानवी हक्कविषयक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर याबाबत व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारला आधी कल्पना का दिली नाही, असा प्रश्न भारतातील सायबर एक्सपर्टनी उपस्थित केला आहे.
'व्हॉट्सअॅप हॅकिंगवर योग्य कारवाई झाली तरच परदेशी समाजमाध्यमांवर हेरगिरी करताना अंकूश बसेल'
सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने लगेच चौकशी करून व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरणावर योग्य ती कारवाई करावी, तरच भारतीय कायद्याचा धाक परदेशातील या सोशल मीडिया कंपन्यांना बसेल, असे मत सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा -१० हजार कोटींची तरतूद कुठे केली ते दाखवा - सचिन सावंत
सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने लगेच चौकशी करून व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरणावर योग्य ती कारवाई करावी, तरच भारतीय कायद्याचा धाक परदेशातील या सोशल मीडिया कंपन्यांना बसेल, असे मत सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी यांनी व्यक्त केले आहे. तसेच व्हॉट्सअॅप प्रकरणाबाबत व लोकांनी सोशल मीडियाच्या अॅपबद्दल कशी काळजी घेतली पाहिजे, याबाबत सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी यांच्याशी अधिक संवाद साधला आहे 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी.