मुंबई -राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे 288 मतदारसंघात असलेले विविध पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष आपल्या प्रचारासाठी जिवाचे रान करताना दिसत आहेत. यात सर्वाधिक आघाडीवर आहेत, ते प्रत्येक पक्षात बंडखोरी केलेले, बंडखोर उमेदवार. राज्यातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे.. ती म्हणजे महाराष्ट्रातील 75 मतदारसंघाचे भविष्य हे पुर्णतः बडखोरांच्या हातात असलेले दिसत आहे.
हेही वाचा... नाशकात युतीत बिघाडी, 36 सेना नगरसेवकांचे राजीनामे
राज्यात सर्वाधिक बंडखोरी झाली ती भाजपमध्ये. राज्यात भाजपच्या 38 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्या खालोखाल शिवसेनेच्या 23 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनुक्रमे 9, 4 इतक्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले होते. यामुळे नेत्यांची भाऊगर्दी झालेल्या या पक्षात युतीनंतर, उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी बंडखोरीचा रस्ता पकडला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बंडखोरांची संख्या अधिक नसली तरी, काही मतदारसंघात त्यांनाही या बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे...
हेही वाचा... दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार अन् बरंच काही...भाजपचा संकल्पनामा प्रसिद्ध
राज्यातील विभागवार मतदारसंघ आणि त्यात बंडखोरी केलेल्या उमेदवारांची यादी ;
मुंबई विभाग
- एकूण - 6 ( भाजप 2, शिवसेना 3)
वांद्रे पूर्व - तृप्ती सावंत, शिवसेना बंडखोर
वर्सोवा मतदारसंघ- राजुल पटेल, शिवसेना बंडखोर
अंधेरी पूर्व - मुरजी पटेल, भाजप बंडखोर
कल्याण पश्चिम - आमदार नरेंद्र पवार, भाजप बंडखोर
कल्याण पूर्व - धनंजय बोडारे, शिवसेना बंडखोर
उल्हासनगर - भगवान भालेराव, रिपाई आठवले गट
हेही वाचा... 'राजस्थान, मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागतील'
कोकण विभाग
- एकूण - 7 (शिवसेना 1, भाजप 2, काँग्रेस 4)
सिंधुदुर्ग जिल्हा
कणकवली मतदारसंघ - सतिष सावंत, शिवसेना बंडखोर
रायगड जिल्हा
श्रीवर्धन मतदारसंघ - ज्ञानदेव पवार (काँग्रेस), दानिश लांबे (काँग्रेस), डॉ. मोईझ शेख (काँग्रेस)
अलिबाग मतदारसंघ - राजेंद्र ठाकूर, काँग्रेस बंडखोर
उरण मतदारसंघ - महेश बालदी, भाजप बंडखोर
पालघर जिल्हा
बोईसर मतदारसंघ - संतोष जनाठे, भाजप बंडखोर
हेही वाचा... ईव्हीएममध्ये नव्हे तुझ्या बोटातच घोळ आहे - अजित पवार
मराठवाडा विभाग
- एकूण - 14 (भाजप 6, शिवसेना 5, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1)
औरंगाबाद जिल्हा
कन्नड मतदारसंघ - किशोर पवार, भाजप बंडखोर
औरंगाबाद पश्चिम- राजू शिंदे, भाजप बंडखोर
बीड जिल्हा
गेवराई - बदामराव पंडित - शिवसेना, बंडखोर
नांदेड जिल्हा
नांदेड दक्षिण - दिलीप कंदकुरते, भाजप बंडखोर
हादगाव - बाबूराव कदम, शिवसेना बंडखोर
उस्मानाबाद जिल्हा
उस्मानाबाद- कळंब - अजित पिंगळे, शिवसेना बंडखोर
उस्मानाबाद- कळंब - सुरेश पाटील, राष्ट्रवादी बंडखोर
जालना जिल्हा
बदनापूर मतदारसंघ - बबलु उर्फ रूपकुमार चौधरी, राष्ट्रवादी बंडखोर
लातूर जिल्हा
अहमदपूर - दिलीप देशमुख, भाजप बंडखोर
औसा - बजरंग जाधव, भाजप बंडखोर
हिंगोली जिल्हा
वसमत - शिवाजी जाधव, भाजप बंडखोर
परभणी जिल्हा
जिंतूर - राम पाटील खराडे, शिवसेना बंडखोर
पाथरी - संजय कचरे, शिवसेना बंडखोर
परभणी शहर - सुरेश नागरे, काँग्रेस बंडखोर
हेही वाचा... शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही, आदित्य ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर
पश्चिम महाराष्ट्र विभाग
- एकूण - 13 (भाजप 6, शिवसेना 5, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 1)
पुणे जिल्हा
कसबा पेठ मतदारसंघ - विशाल धनवडे, शिवसेना बंडखोर
सांगली जिल्हा
सांगली मतदारसंघ - शेखर माने, शिवसेना बंडखोर
जत विधानसभा मतदारसंघ - डॉ. रवींद्र आरळी, भाजप बंडखोर
इस्लामपूर मतदारसंघ - निशिकांत पाटील, भाजप बंडखोर
शिराळा मतदारसंघ - सम्राट महाडिक, भाजप बंडखोर
कोल्हापूर जिल्हा
कागल मतदारसंघ - समरजितसिंह घाटगे, भाजप बंडखोर
चंदगड मतदारसंघ - शिवाजी पाटील, भाजप बंडखोर
शिरोळ मतदारसंघ - राजेंद्र पाटील यड्रावकर, राष्ट्रवादी बंडखोर