महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Special interview : मराठवाड्यात धावणार बुलेट ट्रेन - मंत्री अशोक चव्हाण - बुलेट ट्रेन मंत्री अशोक चव्हाण

देशात विविध ठिकाणी बुलेट ट्रेन धावणार असून त्याचप्रमाणे मराठवाड्यातही बुलेट ट्रेन लवकरच धावणार. तसा प्रस्ताव केल्याची माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी विविध विषयांवर 'ईटीव्ही भारतशी' बातचीत केली.

Minister Ashok Chavan
मंत्री अशोक चव्हाण

By

Published : Dec 2, 2021, 6:47 AM IST

Updated : Dec 2, 2021, 9:09 AM IST

मुंबई -देशात विविध ठिकाणी बुलेट ट्रेन धावणार असून त्याचप्रमाणे मराठवाड्यातही बुलेट ट्रेन लवकरच धावणार. तसा प्रस्ताव केल्याची माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी विविध विषयांवर 'ईटीव्ही भारतशी' बातचीत केली.

मंत्री अशोक चव्हाण यांची मुलाखत घेताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा -प्रधान सल्लागार म्हणून सीताराम कुंटे यांनी स्वीकारला पदभार

मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर ६४ टीएमसी धरणाच्या माध्यमातून तोडगा काढण्यात येत असल्याची माहिती दिली. तर, समृद्धी महामार्ग मराठवाड्यातल्या जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमधूनही जावा यासाठी भूसंपादन करण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने ५० टक्‍क्‍यांपर्यंतची मर्यादा उठवली तरच त्यात निर्णय घेणे शक्य आहे. मात्र, राज्य सरकार आपल्या वतीने संपूर्ण तयारी करत असल्याचे चव्हाण यांनी सांगितलं.

मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबतही न्यायालयात अनेक गोष्टी प्रलंबित असल्याने काम थांबविण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. विरोधक काहीही म्हणत असले तरी, सरकारला कुठलाही धोका नाही. उलट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता भाकित करणे बंद करावे. ते अनेक वेळा तोंडघशी पडले आहेत, असा टोलाही यावेळी बोलताना चव्हाण यांनी लगावला.

हेही वाचा -Kalpita Pimple - फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक आयुक्त पिंपळे पुन्हा सेवेत रुजू, म्हणाल्या..

Last Updated : Dec 2, 2021, 9:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details