मुंबई -सर्वसामान्यांसाठी उपनगरीय लोकल ट्रेन सुरू होताच मध्य रेल्वे मार्गावर स्टंटबाज पुन्हा एकदा सक्रिय झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी सायन ते दादर दरम्यान सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास एक तरुण धावत्या लोकलमध्ये स्टंट करतानाचा व्हिडिओ ईटीव्ही भारतच्या कॅमेरात कैद झाला होता. त्यानंतर बातमी प्रकाशित होताच मध्य रेल्वेने या व्हिडिओतील स्टंटबाजाचा शोध सुरू केला आहे. तसेच या स्टंटबाजाना चाप लावण्यासाठी रेल्वेची सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : लोकलमधील 'त्या' स्टंटबाजांचा रेल्वे पोलिसांकडून शोध सुरू - लोकलमधील स्टंटबाज
सर्वसामान्यांसाठी उपनगरीय लोकल ट्रेन सुरू होताच मध्य रेल्वे मार्गावर स्टंटबाज पुन्हा एकदा सक्रिय झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे पोलिसांचे पथक स्टंटबाजांवर कारवाई करण्यासाठी सज्ज झाले आहे. साध्या वेशात रेल्वे पोलीस लोकल डब्यामध्ये रेल्वे मार्गावर गस्त घालणार आहे. इतकेच नव्हे तर स्टंटबाजांवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे पोलिस सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओवर सुध्दा लक्ष ठेवणार आहे.
समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल-
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असताना सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलसेवा 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे धावत्या लोकलमध्ये स्टंट करणारे स्टंटबाज सक्रिय झाले आहेत. रविवारी सायन ते दादर दरम्यान सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास एक तरुण धावत्या लोकलमध्ये स्टंट करत होता. त्यासंबंधित बातमी सर्वप्रथम ईटीव्ही भारतने प्रकाशित केली होती. त्यानंतर हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला होता. त्यामुळे रेल्वे सुरक्षेवर प्रवाशांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते.