मुंबई -ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी एसआयटीचे ( SIT to probe ED ) गठन करण्यात आले आहे. विरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी कमिटीचे गठन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणची तपासणी सुरू असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. अलीकडच्या काळात काही राजकीय पक्ष भडकावू भाषण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाचे आणि महाराष्ट्राचे ऐक्य आणि सामाजिक सलोखा या दृष्टिकोनातून ही बाब योग्य नाही. या सर्व बाबींवर राज्यसरकार लक्ष ठेवून आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी दिली.
माहिती देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हेही वाचा -Summons to Salman Khan : पत्रकार मारहाणप्रकरणी अंधेरी कोर्टाचे सलमानला समन्स, सलमानची हायकोर्टात धाव
माहाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकार असा संघर्ष पहायला मिळत आहे. मात्र आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये ईडीच्या एका अधिकाऱ्यावर खंडणी रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात संजय राऊत यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार देखील केली होती. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली असून, या एसआयटीचे प्रमुख विरेश प्रभू असणार आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भातील पुरावे आपण आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याचे सांगितले होते. या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जितेंद्र नवलानीविरुद्ध प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामुळे, या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने नवलानी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. आता एसआयटी या प्रकरणाचा सर्व तपास करणार आहे.
संजय राऊत यांचे आरोप काय? :जितेंद्र नवलानी आणि संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स आर्थिक गुन्हे शाखेने बजावले आहे. संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत आरोप करताना जितेंद्र नवलानी हे खंडणीचे रॅकेट चालवत असून त्यांचा मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्यातही सहभाग असल्याचा आरोप केला होता. संजय राऊतांनी अरविंद भोसले नावाच्या एका व्यक्तीने केलेली तक्रार मुंबई पोलीस आयुक्तांना दिली होती. ज्यात जितेंद्र नवलानीच्या नावाने नोंदणी असलेल्या कंपन्यांमध्ये 2015 ते 2020 या काळात जवळपास 70 फर्म्सनी 59 कोटी रुपये जमा केल्याचे म्हटले आहे.
जितेंद्र नवलानी याने फर्म्सच्या मालकांना ईडीच्या कारवाईची आणि अटकेची भीती दाखवत पैसे गोळा केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. काही ईडी अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच जितेंद्र नवलानीने हे कृत्य केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले असून, ईडी कारवाईनंतर नवलानी यांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्यात यायचे. बँक अकाऊंटमध्ये जमा करण्यात आलेल्या 59 कोटींव्यतिरिक्त नवलानी यांना 100 कोटींची रोख रक्कम देण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा -Criminal Procedure Identification Bill 2022 : गुन्हेगारीवरील विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांकडून टीकास्त्र