महाराष्ट्र

maharashtra

राज्यात प्रथमच वाशी येथे कोविड सेंटरमध्ये एच.आर.सी.टी'ची उभारणी, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

By

Published : Jul 2, 2021, 7:29 PM IST

वाशी येथील महानगरपालिका रुग्णालयात, प्रति मिनिट एक हजार लिटर ऑक्सिजन निर्माण करणारा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटमुळे तब्बल 200 बेड्सला ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे. याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

वाशी येथे कोविडं सेंटरमध्ये एच.आर.सी.टी'ची उभारणी करण्यात आली. त्याचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले
वाशी येथे कोविडं सेंटरमध्ये एच.आर.सी.टी'ची उभारणी करण्यात आली. त्याचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले

मुंबई - नवी मुंबईतील वाशी येथील महापालिका रुग्णालयात (एच.आर.सी.टी)डायग्नोस्टिक सेंटरचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हे उद्घाटन येथील ऑक्सिजन प्लांट व सिडको एक्सिबिशन सेंटरमध्ये करण्यात आले. या (एच.आर.सी.टी) डायग्नोस्टिक सेंटरमध्ये 100 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.

राज्यात प्रथमच वाशी येथे कोविडं सेंटरमध्ये एच.आर.सी.टी'ची उभारणी झाली, त्याचे उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते

वाशी येथे पालिका रुग्णालयात उभारला प्लांट

वाशी येथील महानगरपालिका रुग्णालयात, प्रति मिनिट एक हजार लिटर ऑक्सिजन निर्माण करणारा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटमुळे तब्बल 200 बेड्सला ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे. या उपक्रमामुळे नवी मुंबईतील महापालिका रुग्णालयात दाखल असलेल्या गरजू रूग्णांना दिलासा मिळणार आहे. राज्यात प्रथमच कोविडं सेंटरमध्ये (एच आर सी टी)डायग्नोस्टीकची उभारणी झाली आहे. वाशी येथील सिडको एकक्सिबिशन सेंटर येथे राज्यात प्रथमच कोविड सेंटर मध्ये (एच. आर. सी. टी)डायग्नोस्टिक सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. (सी एस आर)फंडच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला असून, कोविडं सेंटरमध्येच रूग्णांची (एच.आर.सी.टी)टेस्ट करण्यात येणार आहे.

रोज 100 रुग्णांची मोफत तपासणी

या सेंटरमध्ये रोज 100 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे नवी मुंबईचा रिकव्हरी रेट वाढेल, असे यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मंत्री शिंदे यांच्या हस्ते ऑक्सिजन प्लांट व एच. आर. सी. टी सेंटर या दोन वास्तूंचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील सर्व कोविडं सेंटरमध्ये (एच.आर.सी.टी)केंद्र उभारण्यात यावेत, या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करणार असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details