महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 26, 2022, 11:49 AM IST

Updated : Jun 26, 2022, 1:53 PM IST

ETV Bharat / city

Equation Of Power Before Governor : राज्यपाल राजभवनात परतले, परंतु नेत्यांना त्यांच्या भेटीसाठी अजून २ दिवस थांबावे लागणार?

मुंबई - मागच्या आठवड्यात करोना ग्रस्त झालेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) आज चार दिवसाच्या हॉस्पिटलमधील उपचारानंतर राजभवनवर ( Raj Bhavan ) पुन्हा दाखल झाले आहेत. वास्तविक शिवसेना बंडखोर नेते मंत्री एकनाथ शिंदे ( Shivsena rebel leader Eknath Shinde ) यांच्या शिवसेनेचा मोठा गट फोडल्यामुळे राज्यातील राजकारणात उलथापालथ सुरू असताना या सर्व घडामोडीत राज्यपालांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. म्हणून सर्वांचे राज्यपालांच्या तब्येतीकडे लक्ष लागले होते. आज राज्यपाल राजभवनात परतले असले तरी त्यांना कामकाजात सक्रिय व्हायला अजून २ दिवस तरी लागणार आहेत, असं राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Governor
Governor

मुंबई -मागच्या आठवड्यात करोना ग्रस्त झालेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) आज चार दिवसाच्या हॉस्पिटलमधील उपचारानंतर राजभवनवर ( Raj Bhavan ) पुन्हा दाखल झाले आहेत. वास्तविक शिवसेना बंडखोर नेते मंत्री एकनाथ शिंदे ( Shivsena rebel leader Eknath Shinde ) यांच्या शिवसेनेचा मोठा गट फोडल्यामुळे राज्यातील राजकारणात उलथापालथ सुरू असताना या सर्व घडामोडीत राज्यपालांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. म्हणून सर्वांचे राज्यपालांच्या तब्येतीकडे लक्ष लागले होते. आज राज्यपाल राजभवनात परतले असले तरी त्यांना कामकाजात सक्रिय व्हायला अजून २ दिवस तरी लागणार आहेत, असं राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Governor

राजकीय उलथापालथीत राज्यपालांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष? -मागच्याच आठवड्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ४० पेक्षा जास्त आमदारांचं समर्थन घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन घडामोडी अतिशय वेगाने सुरू झालेल्या असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करोनाची लागण झाल्याची बातमी मागच्या बुधवारी समोर आली. कोश्यारी यांना करोनाची लागण झाल्यावर त्यांचा चार्ज गोव्याचे राज्यपाल यांच्याकडे दिला जाईल, अशी चर्चा ही रंगू लागली होती. परंतु सर्वस्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडेच कार्यभार राहणार असल्याचे राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले. आणि आज राज्यपाल ४ दिवसांच्या उपचारानंतर आज राजभवनला परतले आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यपालांचे महत्त्वही फार वाढलेले आहे.

राज्यपालांच्या भेटीसाठी अजून २ दिवस वाट पहावी लागणार? -शिवसेनेच्या ७ बंडखोर मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून राज्यपाल यांना पत्र देण्यात येणार आहे. या पत्रावर सुद्धा राज्यपाल काय कारवाई करतात हे बघणे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर राज्यपालांचा आतापर्यंतचा इतिहास बघता त्यांची भाजपशी असलेली जवळीक बघता, महाविकास आघाडीकडून येणाऱ्या प्रस्तावावर राज्यपाल काय भूमिका घेतात व किती जलद गतीने घेतात यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे? परंतु सध्या तरी राज्यपाल यांची प्रकृती जरी उत्तम असली तरी सुद्धा त्यांचं वय बघता अजून २ दिवस तरी ते कुणाला भेटण्याची शक्यता कमी आहे, असे राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आल्या कारणाने राज्यपालांच्या भेटीसाठी अजून राजकीय नेत्यांना २ दिवस वाट पहावी लागणार आहे, हे नक्की.

हेही वाचा -Rebel Shivsena MLA : साहेब मध्यस्थी करा..बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांची चंद्रकांत खैरेंना फोनवरून विनंती

Last Updated : Jun 26, 2022, 1:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details