मुंबई -गणेशोत्वसाठी बहुसंख्य मंडळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या उंच मुर्त्यांचा वापर करतात. मात्र, माटुंगा येथील जीएसबी गणेशोत्सव मंडळांकडून शाडू मातीपासून सात फुटाची मूर्ती बनवण्यात आली आहे. या मूर्तीला इको फ्रेंडली रंग देण्यात आले आहेत. Use of gold and silver for decoration of Ganesha Murti of GSB यामुळे समुद्रात किंवा कुठेही या मूर्तीचे विसर्जन केल्यास केवळ अर्ध्या तासात मातीची मूर्ती पाण्यात विरघळून जाणार आहे. मूर्तीचे रंगही पर्यावरण पूरक आलस्याने पाण्यामधील मासे आणि आणि इतर प्राण्यांना कोणतीही इजा यापासून होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. या मंडळाकडून गणपतीच्या आभुषणासाठी आणि सजावटीसाठी ६६ किलो सोनं आणि ३०० किलो चांदीचा वापर केला जाणार आहे. यामुळे येथील गणेश मूर्ती ही सोन्याचा गणपती म्हणून ओळखली जाते. या मंडळाला दिवसाला सव्वा ते दीड लाख भाविक भेट देतात अशी माहिती जीएसबी सेवा मंडळाचे विश्वस्त आणि प्रवक्ते अमित पै यांनी दिली आहे.
३१६.४ कोटीचा विमा - जीएसबी मंडळ श्रीमंत मंडळ म्हणून ओळखले जाते. या श्रीमंत मंडळाकडून तब्बल ३१६.४ कोटीचा विमा काढण्यात आला आहे. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडून हा विमा काढण्यात आला आहे. Environmentally friendly statue of GSB याआधी २०१६ मध्ये मंडळाने ३०० कोटी रुपयांचा विमा काढला होता. ३१६.४० कोटी रुपयांच्या विम्यामध्ये सोने, चांदी आणि मूर्तीची सजावट करणाऱ्या दागिन्यांसाठी ३१.९७ कोटी रुपये, मंडळासाठी काम करणारे स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी, फुटवेअर स्टॉलचे कर्मचारी, पार्किंग कामगार आणि कोणतीही दुर्घटना घडल्यास सुरक्षा रक्षक यांच्यासाठी २६३ कोटी रुपये, आग आणि भूकंपामुळे झालेल्या नुकसानीच्या वस्तू जसे की फर्निचर, इतर फिटिंग्ज, संगणक, सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर, भांडी, फळे आणि भाजीपाला इत्यादींसाठी १ कोटी रुपये असा विमा काढण्यात आला आहे.