सोसायटी पदाधिकाऱ्यांना चाप; आता वृत्तपत्र, दूध विक्रेत्यांसह कामगारांना मज्जाव करता येणार नाही - सोसायटीमध्ये कामगारांना प्रवेश
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात गृहनिर्माण संस्थांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणीही सोयीस्करपणे केली जात होती. तसेच अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते आणि घरकाम करणाऱ्या कामगारांना मज्जाव करण्यात येत आहे. मात्र आता शासनाने दिलेल्या नव्या आदेशानुसार हे गृहनिर्माण संस्थांना करता येणार नाही.
मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांचे डॉक्टर जलील पारकर यांनी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता घर कामगार व वाहन चालक यांना प्रवेश प्रतिबंधित न करण्याबाबत सहकार विभागाने एक पत्रक जारी केले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश बंदी केल्याने वयोवृद्ध रहिवासी आणि घर कामगारांचे हाल होत होते. मात्र आता सहकार विभागाने सोसायटीच्या आवारात या श्रमिक वर्गाला प्रवेश बंदी नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि मनमानी नियम करु नये, अशा स्पष्ट सूचना गृहनिर्माण संस्थांना देण्यात आल्या आहेत.
टाळेबंदी शिथिल होत असतानाच राज्य आणि केंद्र शासनाने वृत्तपत्र वितरण आणि घरकामगार यांच्यासह घरांच्या डागडुजीची कामं करणारे मजूर यांना संमती दिली होती. असे असूनही मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील अनेक गृहनिर्माण संस्थानी मनमानी सुरू ठेवल्याचे विभागाच्या लक्षात आले होते.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात गृहनिर्माण संस्थांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणीही सोयीस्करपणे केली जात होती. तसेच अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते आणि घरकाम करणाऱ्या कामगारांना मज्जाव करण्यात येत आहे. मात्र आता शासनाने दिलेल्या नव्या आदेशानुसार हे गृहनिर्माण संस्थांना करता येणार नाही.
लॉकडाऊनच्या काळात अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश बंदी केल्याने वयोवृद्ध रहिवासी आणि घर कामगारांचे हाल होत होते. मात्र आता सहकार विभागाने सोसायटीच्या आवारात या श्रमिक वर्गाला प्रवेश बंदी नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि मनमानी नियम करु नये, अशा स्पष्ट सूचनाही गृहनिर्माण संस्थांना देण्यात आल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर जलील पारकर यांनी नुकतेच कोरोना विरोधातील लढाई जिंकून सोसायटी पदाधिकारी मनमानी करत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर सहकार विभागाने पत्रक काढून सर्व सोसायटी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.