महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकच्या अपघाताची होणार चौकशी; परिवहनमंत्र्यांचे आदेश - malegaon accident news

मालेगावहून देवळा येथे जाणारी एसटी बस आणि रिक्षा यामध्ये झालेल्या अपघाताची चौकशी करून त्यासंबंधी अहवाल सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत.

malegaon accident news
नाशिकच्या अपघाताची चौकशी होणार ; परिवहनमंत्र्यांचे आदेश

By

Published : Jan 29, 2020, 1:46 PM IST

मुंबई - मालेगावहून देवळा येथे जाणारी एसटी बस आणि रिक्षा यांच्यामध्ये मंगळवारी(28जानेवारी) भीषण अपघात झाला. यामध्ये रिक्षासहित बस विहिरीत कोसळल्याने 25 प्रवासी ठार, तर 31 जण जखमी झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यावर अहवाल सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाखांची आर्थिक मदत राज्य सरकार देणार आहे.

संबंधित अपघातात मानवी चुका असल्यास त्याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार परिवहन मंत्री अनिल परब आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ तातडीने घटनास्थळाची पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details