महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BEST Bus बेस्टच्या नवरात्रौत्सव योजनेला प्रचंड प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 15 हजार प्रवाशांनी घेतला लाभ - चलो ॲपच्या माध्यम

BEST Bus मुंबईची लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाने आपल्या प्रवाशांसाठी नवनवीन योजना आणत आहे. सध्या नवरात्रौत्सवासाठी योजना जाहीर करण्यात आली आहे. त्याला प्रवाशांकडून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 15 हजार प्रवाशांनी याचा लाभ घेतला असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

BEST Bus
BEST Bus

By

Published : Sep 27, 2022, 4:07 PM IST

मुंबई मुंबईची लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाने आपल्या प्रवाशांसाठी नवनवीन योजना आणत आहे. सध्या नवरात्रौत्सवासाठी योजना जाहीर करण्यात आली आहे. त्याला प्रवाशांकडून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 15 हजार प्रवाशांनी याचा लाभ घेतला असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत असल्याने भाडेतत्वावर बस चालवत आहे. त्यातच प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी बेस्टकडून नवनवीन योजना आणल्या जात आहेत. चलो ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात बेस्टने 179 रुपयांची योजना आणली होती. या योजनेनुसार भाविकांना 10 दिवस रात्री कुठेही प्रवास करता येणार होता. यानंतर आता बेस्टने नवरात्रौत्सव दरम्यान प्रवाशांना प्रवास करता यावा यासाठी 19 रुपयांची योजना आणली आहे. त्यात 10 दिवसात 10 वेळा कधीही कुठेही प्रवास करता येणार आहे. 19 रुपयांचे हे तिकीट चलो ॲपवरून विकत घ्यायचे आहे. 26 सप्टेंबरला एकाच दिवसात 15 हजार प्रवाशांनी तिकीट विकत घेतले आहे.

असा करा प्रवास चलो अँप डाऊनलोड करणे, त्यानंतर बस पास पर्याय निवडावा, बस पास पर्याय निवडल्यानंतर दसरा ऑफर पर्याय निवडल्यानंतर आपली सविस्तर माहिती नोंद करावी. त्यानंतर डेबिट कार्ड, युपीए, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे 19 रुपयांचे तिकीट पास मिळेल. 19 रुपयांचा बस पास चलो अँपवर डाऊनलोड केल्यानंतर संबंधित प्रवाशाने एका दिवसांत 10 बस फेऱ्यांचा प्रवास करावा किंवा रोज एक फेरी प्रमाणे 10 फेऱ्या पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे. वातानुकूलित बस, विना वातानुकूलित बस, हो बस तसेच विमान प्रवाशांसाठी चालवण्यात येणाऱ्या बसने 19 रुपयांच्या तिकीटात प्रवास करता येणार असल्याची माहिती माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे.

बेस्टची डिजिटल सेवा बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर वाढवला आहे. सुट्ट्या पैशांमुळे प्रवासी आणि वाहकात होणारे वाद, तिकिटासाठी वेळेचा अभाव यामुळे बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणाली अंमलात आणली आहे. चलो अँप, स्मार्टकार्डमुळे लाखो प्रवाशांची वेळेची बचत होत असून चालक व प्रवाशांमधील होणारे वाद जवळपास संपुष्टात आले आहे. चलो अँपचा सद्यस्थितीत 22 लाख प्रवासी वापर करत असून डिजिटल तिकीट प्रणाली अधिकाधिक प्रवाशांपर्यत पोहोचावी यासाठी नवरात्रौत्सवात प्रवाशांसाठी विशेष ऑफर उपलब्ध केल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details