मुंबई -मुंबईत अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने प्रभादेवी येथील इंडिया बुल्स या व्यवसायिक इमारतीमधील कॉर्पोरेट ऑफिसमध्ये धाड टाकल्याची माहिती सुत्रांनी ( Enforcement Directorate Raids Indiabulls ) दिली. दिल्ली आणि मुंबईच्या संयुक्त पथकाने पीएमएलए कायदा 2002 अंतर्गत ही छापेमारी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया बुल्स हाऊसिंगचे प्रमोटर समीर गेहलोत यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या निमित्ताने ही छापेमारी सुरू आहे. पालघरमध्ये 2014 आणि 2020 मध्ये झालेल्या पैशांच्या हेराफेरीच्या प्रकरणातील गुन्ह्यांच्या अहवालावर आधारीत छापेमारी केली आहे. त्यामध्ये इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सच्या कंपनीचाही समावेश आहे.
इंडिया बुल्सने पैशाची हेराफेरी करतानाच वाढीव किंमतीसाठी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. प्राथमिक स्वरूपातील तक्रारीमध्ये तक्रारदाराने रियल इस्टेट कंपन्यांचाही उल्लेख केला होता. या कंपन्यांनी इंडिया बुल्सकडून कर्ज घेतले होते. पण कर्जाची रक्कम ही इंडियाबुल्स हाऊसिंगच्या शेअर्समध्ये पाठवण्यात आली होती.