महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाचा फायदा घेत मुंबईत अतिक्रमणे वाढली

अतिक्रमणांवर विभागवार होणारी पालिकेची कारवाई पूर्णपणे ठप्प आहे. पालिकेच्या अॅपवर येणाऱ्या तक्रारींवर काही कार्यवाही होत नाही. याचा फायदा घेत अतिक्रमणे उभी राहिली असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

encroachments
अतिक्रमणे वाढली

By

Published : May 24, 2021, 8:00 PM IST

मुंबई -मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने आपली सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. सर्व अधिकारी कर्मचारी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अतिक्रमणांवर विभागवार होणारी पालिकेची कारवाई पूर्णपणे ठप्प आहे. पालिकेच्या अॅपवर येणाऱ्या तक्रारींवर काही कार्यवाही होत नाही. याचा फायदा घेत अतिक्रमणे उभी राहिली असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. बांद्रा, गोवंडी, मानखुर्द आणि कांदीवली या विभागातील झोपडपट्टी परिसरात अतिक्रमणे वाढल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने दिली आहे.

हेही वाचा -सिप्ला 'या' औषधाची करणार विक्री; मृत्यूदर कमी होत असल्याचा दावा

यंत्रणा उपलब्ध नाही -

गेल्या वर्षीपासून काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. पालिका प्रशासनाने पूर्ण लक्ष काेराेनावर केंद्रीत केले आहे. त्यामुळे अतिक्रमणांवरील कारवाई गेल्या वर्षभरापासून जवळजवळ ठप्प आहे. त्याबाबत तक्रार आली तरी कारवाई करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही. कारवाई करण्यासाठी पाेलीस संरक्षणाची गरज असते. मात्र पाेलीसही आता काेराेनाच्या काळातील लाॅकाडाऊनमधील नाकाबंदी आणि संरक्षणाच्या कामासाठी तैनात आहेत. त्यामुळे अतिक्रमणांवरील कारवाईत माेठा खंड पडला असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

यंत्रणा ढेपाळली -

पालिकेच्या रिमाेवल ऑफ एन्क्राेचमेंट डिपार्टमेंट अ‌ॅपवर नागरिकांना अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणांबाबत तक्रारी करण्याची व्यवस्था पालिकेने केली आहे. ही प्रणाली महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनधिकृत बांधकामांचे किंवा अतिक्रमणांचे फोटो तक्रारदाराने संकेतस्थळावर किंवा अॅपवर टाकण्याची व्यवस्था केली हाेती. काेराेनामुळे ही सर्व यंत्रणा ढेपाळली असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा -महाविकास आघाडी सरकारने सारथीची वाट लावली - चंद्रकांत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details