महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मध्य रेल्वेच्या विजेवर चालणाऱ्या लोकलचे 95व्या वर्षांत पर्दापण - News about EMU of Central Railway

मध्य रेल्वेच्या विजेवर चालणाऱ्या लोकलचे ९५ व्या वर्षात पदार्पण झाले. या निमीत्त सीएमएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर मुंबई विभागतील निवृत्त कर्मचाऱ्याच्या हस्ते रेल्वेच्या विजेवर चालणाऱ्या लोकलचे सेवेला हिरवा झेडा दाखवून रवाना करण्यात आले.

emu-of-central-railway-debuted-in-the-95th-year
मध्य रेल्वेच्या ईएमयूचे 95व्या वर्षांत पर्दापण

By

Published : Feb 3, 2020, 6:22 PM IST

मुंबई -मध्य रेल्वेच्या विजेवर चालणाऱ्या लोकलचे आज ९५ वर्षात पदार्पण झाले. या निमीत्त सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर मुंबई विभागातील निवृत्त कर्मचारी वीणाधरन पी टी यांनी मध्य रेल्वेतील विजेवर चालणाऱ्या लोकल सेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. फेब्रुवारी 1925 रोजी मुंबईच्या तत्कालीन राज्यपाल सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते 4 कारसह प्रथम विजेवर चालणाऱ्या लोकल सेवेचा शुभारंभ झाला होता. पहिली सेवा तत्कालीन बॉम्बे व्हिटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) ते हार्बर मार्गावरील कुर्ला पर्यंत धावली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एक विजेवर चालणाऱ्या लोकलचे पत्रक ही प्रकाशित केले.

मध्य रेल्वेच्या ईएमयूचे 95व्या वर्षांत पर्दापण

वर्षानुसार बदलत गेलेले विजेवर चालणाऱ्या लोकलचे प्रकार -

1925 हार्बर मार्गावर

4-कार(डब्बे)

1927 मेन लाइन आणि हार्बर मार्ग

8-कार (डब्बे)

1961 मेनलाईनवर

9-कार (डब्बे)

1986 मेनलाइनवर

12-कार(डब्बे)

1987 कर्जतच्या दिशेने

12-कार(डब्बे)

2008 कसाऱ्याच्या दिशेने

12- कार (डब्बे)

2010 ट्रान्सहार्बर लाइनवर

12-कार (डब्बे)

2012 मुख्य मार्गावरील

15-कार (डब्बे)

2016 हार्बर मार्गावर 12-कार (डब्बे) 2020 ट्रान्सहार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल

ABOUT THE AUTHOR

...view details