मुंबई : राज्यात आणि देशात बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे. मात्र पात्र असलेल्या उमेदवारांना नाबार्ड या शासकीय संस्थेमध्ये नोकरी करण्याची संधी NABARD Employment opportunities मिळणार आहे. नाबार्ड या शासकीय संस्थेमध्ये National Bank For Agriculture And Rural Development विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम apply today मुदत 10 ऑक्टोबर 2022 पर्यन्त आहे. महाराष्ट्रात 75 पदांची देशात एकूण 177 जागा भरती Employment opportunities in government organization NABARD होणार आहे.
सूचना : एकूण 177 पदांसाठी ही जाहिरात आहे. या पदांसाठी विविध प्रकारच्या शैक्षणिक पात्रता देखील नाबार्ड या संस्थेने नमूद केलेल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज करावा असे देखील सुचित केले गेले. राज्यात 75 पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांमध्ये विविध सामाजिक प्रवर्ग माजी सैनिकांचे नातेवाईक अशा सर्वांना जागा आरक्षित केलेले आहे. त्यामुळे त्यासंबंधीच्या उमेदवारांनी आपापले जातीचे दाखले संदर्भातील कागदपत्रे सर्व तयारी करूनच अर्ज करावा. अशी सूचना नाबार्ड द्वारे करण्यात आलेली आहे
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) विकास सहाय्यक (Development Assistant)173 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील किमान 50 टक्के गुणांसह बॅचलर पदवी उत्तीर्ण झालेले असावे.
2) विकास सहाय्यक (हिंदी) / Development Assistant (Hindi) : 04 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजी व हिंदी माध्यम बॅचलर पदवी सह हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले असावे.
वयाची अट :या सर्व पदांसाठी उमेदवारांच्या वयाची अट देखील नाबार्ड या संस्थेने घालून दिलेली आहे. वयोमर्यादा 21 वर्षे ते 35 वर्षापर्यंत असणार आहे.
• परीक्षा शुल्क : सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस या प्रवर्गासाठी 450 रुपये. तर SC, ST, PWD, EWS व माजी सैनिक यांच्याकरिता 50 रुपये परिक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. नाबार्ड शासकीय संस्थेमधील या पदांसाठी पगाराची मर्यादा देखील शासनाने निश्चित केलेली आहे. पगार 13,150 रुपये ते 34,990 रुपये इतकी मर्यादा निश्चित केलेली आहे.
• अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नाबार्ड या शासकीय संस्थेची संकेतस्थळ खालील प्रमाणे या संकेतस्थळावर भेट देऊन इंग्रजी किंवा हिंदी दोन्ही भाषेमधून आपण माहिती पाहू शकतो. वाचू शकतो आणि त्या ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरू शकतो. अशी नाबार्ड या शासकीय संस्थेने माहिती दिली आहे. https://www.nabard.org/careers-notices1.aspx?cid=664&id=26 अधिक माहिती करीता या संकेत स्थळावर भेट द्या.