मुंबई- एकीकडे पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक अधांतरी, तर दुसरीकडे लॉकडाऊन दरम्यान अनेकांचे रोजगार जाणार असल्याची चर्चा असल्याने तरुणाई धास्तावली आहे. त्यामुळे रोजगारीची चिंता तरुणाईला सतावत आहे. याबद्दल काही तरुणाईंकडून जाणून घेतले आहे 'ईटीव्ही भारत'ने.
तरुणांना भेडसावते राजगाराची चिंता... - lockdown effect on job
देशभरात कोरोना थैमान घालत आहे. यामध्ये लॉकडाऊन काळात अनेकांना नोकरीपासून मुकावे लागले आहे. कोरोना काळात व्यापार नसल्यामुळे सर्व क्षेत्रात मंदी आहे. काहींना कामावरून देखील कमी करण्यात आले आहे.
![तरुणांना भेडसावते राजगाराची चिंता... job](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7657451-thumbnail-3x2-d.jpg)
देशभरात कोरोना थैमान घालत आहे. यामध्ये लॉकडाऊन काळात अनेकांना नोकरीपासून मुकावे लागले आहे. कोरोना काळात व्यापार नसल्यामुळे सर्व क्षेत्रात मंदी आहे. काहींना कामावरून देखील कमी करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना रोजगाराची देखील चिंता आहे. यामध्ये पदवीधर आणि अधिष्ठित झालेल्या तरूणाईला देखील शिक्षणानंतर आपल्याला रोजगार मिळेल की नाही, याची चिंता भेडसावत आहे.
अशाच मुंबईत राहणाऱ्या रेश्मा आरोटे या तरुणीने मास्टर ऑफ आर्ट्सचे शिक्षण यावर्षी पूर्ण झाले आहे. यानंतर नोकरी आपण करू असा तिचा निर्णय आहे. परंतु कोरोना काळात अनेक कंपन्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे कंपन्यांनी आपल्या कामगारांना कामावरून पायउतार केलेले आहे. अशात आम्हा नवीन तरुणांना रोजगार कसा मिळेल? असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. त्यामुळे सरकारने आमच्यासारख्या तरुणाईला रोजगारात चिंता भेडसावत आहे. यावर काहीतरी करावे तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करावा, अशी मागणी रेश्मा आरोटेसारखे अनेक तरुणाई करत आहे. अशाच मुंबईत राहणाऱ्या तरुणांची मत जाणून घेतली आहे 'ई टीव्ही भारत'ने.