मुंबई - महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ गावी परतल्यानंतर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी सरकार एम्प्लॉयमेंट ब्युरो स्थापन करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत दिली. देसाई यांनी आज राज्यातल्या सुरू झालेल्या उद्योगांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
'परप्रांतीय मजुरांची पोकळी भरून काढण्यासाठी एम्प्लॉयमेंट ब्युरो स्थापन करणार' - एम्प्लॉयमेंट ब्युरो न्यूज
राज्यात अनेक ठिकाणी परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ गावी परतले आहेत. त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे भूमिपुत्रांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली असल्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
राज्यात अनेक ठिकाणी परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ गावी परतले आहेत. त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे भूमिपुत्रांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार पुढाकार घेणार असून ११ ठिकाणी महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट ब्युरो स्थापन करणार आहोत, असेही देसाई यांनी सांगितले. हे बोर्ड कंपन्यांना भूमिपुत्र कामगार पुरवणार आहे. त्यासाठी कंपन्यांनी आपली मागणी नोंदवायची आहे. अर्थचक्र नव्याने सुरू व्हावे यासाठी सरकारने एप्रिल महिन्यात काही उद्योगांना परवानगी दिली होती. त्यानंतर विविध 55 हजार उद्योग सुरू झाले आहेत. त्याठिकाणी 13 लाख 86 हजार कामगार हजर झाले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी कामगारांची उपलब्धता दिल्यास अडचण येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई, पुणे, पिंपरी, ठाणे, मालेगाव, औरंगाबाद मधल्या काही उद्योगांना अद्याप परवानगी देण्यात आली नाही. मात्र, पुढच्या काळात परिस्तिथी निवळल्यास त्यांनाही परवानगी देण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतीला लागणारे अवजारे, खतांसाठी परवानगी देण्यात आली आहे.