मुंबई -बेस्टचे अनेक आगार तातडीने बंद करून ते खासगी कंत्राटदारांना देण्याचा घाट घातला जातो आहे. याला बेस्ट कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. बेस्टच्या मालकीच्या जागा खासगी कंत्राटदारांना देऊ नये, बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे, बेस्ट प्रशासनाने ३ हजार ३३७ स्वमालकीच्या बसगाड्यांचा ताफा कायम राखणे आदी मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम १४ मार्चपासून सुरू होणार आहे. या स्वाक्षरी मोहिमेसह, प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिली आहे.
बेस्टचे कंत्राटीकरण - कर्मचारी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार - मुंबई बेस्टचे खासगीकरण बातमी
प्रतीक्षानगरसह इतर आगार कमी किमतीत भाडेतत्त्वावर दिले असून या निर्णयालाही कृती समितीने विरोध केला आहे. या प्रमुख मागण्यांसाठी बेस्टकडून स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असून याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.
स्वाक्षरी मोहीम
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या २०१९ च्या संपादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला होता. बेस्टचा विलिनीकरणाचा प्रश्न सोडवला जाईल, तसेच ३ हजार ३३७ बेस्ट बसगाड्या कायमस्वरुपी राखल्या जातील असे आश्वासन बेस्ट उपक्रमाने दिले होते. परंतु आता बेस्टमध्ये ३ हजार ५१९ बस असून त्यातील १ हजार ६२३ बस भाडेतत्वावरील आहेत, असे कृती समितीचे पदाधिकारी शशांक राव यांनी सांगितले. तसेच प्रतीक्षानगरसह इतर आगार कमी किमतीत भाडेतत्त्वावर दिले असून या निर्णयालाही कृती समितीने विरोध केला आहे. या प्रमुख मागण्यांसाठी बेस्टकडून स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असून याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.
२४ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
या खासगीकरणामुळे २४ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली आहे. येत्या काळात बेस्ट ३ हजार बसेस भाडेतत्वावर घेणार आहे. यात चालक वाहकांची नियुक्ती सुद्धा कंत्राटदारामार्फत केली जाणार आहे. यामुळे बेस्ट उपक्रमातील नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे, अशी भीतीही प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली आहे.