मुंबई -नवाब मलिक यांची कन्या आणि ड्रग्ज प्रकरणात आठ महिने तुरुंगात राहिलेले त्यांचे जावई समीर खान यांची पत्नी निलोफर यांनी एक पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी समीर खान यांच्या अटकेनंतर समाजाचा त्यांच्याकडे आणि त्यांच्या मुलांकडे पाहाण्याचा दृष्टीकोण कसा बदलला. त्यांना आणि त्यांच्या मुलांना कसा अपमान सहन करावा लागला. या प्रकरणात एनसीबीकडे कोणतेही ठोस पुरावे नसताना त्यांना अटक करण्यात आली. याचा त्यांच्या आयुष्यावर कसा वाईट परिणाम झाला आहे. असाच अन्याय इतर कोणावर झाला असेल तर त्यांनी पुढे यावे आणि आमच्यासोबत लढा द्यावा, असे आवाहन निलोफर यांनी खुल्या पत्रातून केले आहे.निलोफर यांचे पती समीर खान यांना एनसीबीने अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जानेवारीत अटक केली होती.
'मला ड्रग्ज पेडलरची बायको म्हणून हिनवलं', नवाब मलिक यांच्या मुलीचं सोशल मीडियावर भावनिक पत्र - समीर वानखेडे
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी खान यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले. परंतु तिथं प्रसार माध्यमांचे फोटोग्राफर आणि कॅमेरामॅन आधीपासून कसे उपस्थित होते, असा सवाल त्यांनी पत्रातून उपस्थित केला आहे. सलग १५ तास चौकशीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या पतीला अटक केली. मात्र अटकेचे कारण स्पष्ट केले नव्हते. तो काळ माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत तणावाचा होता. आमची जी अवस्था झालेली ती शब्दात मांडणे कठीण आहे असे निलोफर यांनी पत्रात लिहिले आहे.
नवाब मलिक यांच्या मुलीचं सोशल मीडियावर भावनिक पत्र
हा तपास आता एनसीपीच्या एका अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. प्रशासकीय वर्तुळातही याबाबत दबक्या आवाजात बोलले जात आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत ही आपली बाजू लावून धरली होती. त्यानंतर या प्रकरणात विविध घडामोडी घडत गेल्या. दरम्यान नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.