मुंबई -काही दिवसांपूर्वी कोकण व पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. त्याकरिता आज राज्य सरकारने नुकसानीपोटी तातडीची मदत म्हणून तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच यावेळी मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानीबाबत सादरीकरण केले.
'तीन महिन्यात आरटीडीएस प्रणाली राबवाट'
पूर, दरड समस्येवर कायमस्वरूपी उपाय करा, तज्ञ व प्रशासकांची समिती नेमून ३ महिन्यात अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश दिले आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पूराचे संकट, दरडी कोसळण्याच्या घटना यावर तातडीने कारवाई कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. महाड व चिपळूण शहरातील पूर नियंत्रणासाठी तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार वाशिष्टी, गांधारी, सावित्री नद्यातील वेट व गाळा काढून मॉडेल स्टडीच्या आधारे पूर संरक्षण भिंत ३ वर्षात पूर्ण करा, कोकणातील बांधकामाधीन प्रकल्प येणाऱ्या ३ वर्षात पूर्ण करा, कोयना टेलरेस पाणी मुंबई लिंक प्रकल्पासाठीच्या डीपीआरवर अभ्यास करुन ३ महिन्यात निर्णय घ्यावा, डोंगर कोसळण्याच्या घटनेवर प्रतिबंधासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ व प्रशासकांची समिती नेमून ३ महिन्यात अहवाल तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.