महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडे यांचा जामीनासाठी विशेष NIA न्यायालयात अर्ज

नक्षलवादी चकमकीत (Naxalite) मारला गेलेल्या मिलिंद तेलतुंबडेच्या (Milind teltumbde) भावाने, प्रा आनंद तेलतुंबडे (Anand teltumbde) यांनी जामीन (bail) मिळण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयात (special NIA court) अर्ज केला आहे. गडचिरोलीतील कोर्चीमध्ये झालेल्या चकमकीत 26 जण (naxalite killed) ठार झाले होते. यामध्ये मिलिंद तेलतुंबडेचा समावेश आहे.

anand teltumbde
anand teltumbde

By

Published : Nov 23, 2021, 7:33 PM IST

मुंबई -पुण्यातील एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडेने (Anand teltumbde) जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर NIA ला उत्तर सादर करा, असा आदेश विशेष एनआयए न्यायालयाने आज राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएला दिले आहेत. नक्षलवादी चकमकीत मारला गेलेल्या मिलिंद तेलतुंबडेच्या (Milind teltumbde) भावाने प्रा आनंद तेलतुंबडे (Anand teltumbde) यांनी जामीन मिळण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयात अर्ज केला आहे.


एल्गार परिषद प्रकरणात आनंद तेलतुंबडे (Anand teltumbde) देखील आरोपी आहेत. भीमा कोरेगाव येथे 31 डिसेंबर 2017 आणि 1 जानेवारी 2018 दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आनंद तेलतुंबडेंना मागील वर्षी अटक करण्यात आली होती.


मिलिंद तेलतुंबडेंचा (Milind teltumbde) आणि आमच्या कुटुंबाचा संबंध तुटला आणि तो कोणाच्या संपर्कात नव्हता. माझ्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून आईचे वय नव्वदच्या आसपास आहे. घरातील मोठा मुलगा या नात्याने अशा प्रसंगी मी त्यांच्या बरोबर असणे भावनिकदृष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे मला 15 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करावा अशी मागणी तेलतुंबडे यांनी विशेष एनआयए न्यायालयात अर्जाद्वारे केली आहे. यावर विशेष एनआयए न्यायालयाच्या विशेष न्या. डी. ई. कोथळीकर यांनी एनआयएला यावर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

काय होती याचिका ?

जानेवारी २०२१ मध्ये आनंद तेलतुंबडे (Anand teltumbde) यांनी विशेष एनआयए न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानुसार एनआयएने दाखल केलेल्या एफआयआर आणि आरोपपत्रात आपल्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत. जातीयवादी शक्तींकडून मला या प्रकरणात जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले असून जामीन देण्याची विनंती अर्जातून करण्यात आली होती. तर, तेलतुंबडे हे माओवाद्यांशी संबंधित प्रतिबंधित संघटनेचे सक्रिय सदस्य होते. या संघटनेने हिंसाचाराला चिथावणी दिली. या संघटनेशी संबंधित कबीर कला मंचने पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेलाही ते उपस्थित होते असा युक्तिवाद एनआयएकडून कऱण्यात आला होता. तो ग्राह्य धरत न्यायालयाने तेलतुंबडेचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details