महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'26/11' मुंबईवरील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला 11 वर्षे पूर्ण : अजूनही जखमा ताज्याच - Ashok Kamte

मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी अतुलनीय धाडस दाखवत पाकिस्तानमधून आलेल्या 9 दहशतवाद्यांना यमसदनाला धाडले होते. सहाय्यक उपनिरिक्षक तुकाराम ओंबळे यांनी कसाबवर झडप घालून त्याला पकडून ठेवले. या घटनेत त्यांनी प्राण गमावले. 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याच्या आठवणी आजही मुंबईकराच्या मनात कायम आहेत.

Eleven years completed of terrorist attack on Mumbai
'26/11' मुंबईवरील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला 11 वर्षे पूर्ण : अजूनही जखमा ताज्याच

By

Published : Nov 26, 2019, 4:05 AM IST

Updated : Nov 26, 2019, 3:23 PM IST

मुंबई - 26 नोव्हेंबर 2008 ला दहशतवाद्यांनी केलेल्या मुंबईवरील हल्ल्याला आज 11 वर्षे पूर्ण होत आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीवरील हल्ल्याच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या स्मरणात आहेत.
देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन मानले जाणाऱ्या मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 164 नागरिक बळी पडले होते. तर सुमारे 600 नागरिक जखमी झाले होते. त्यावेळी मुंबई पोलीस दलातील महत्त्वाचे अधिकारी दहशतवाद्यांबरोबरील चकमकीत शहीद झाले.

'26/11' मुंबईवरील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला 11 वर्षे पूर्ण : अजूनही जखमा ताज्याच

हेही वाचा - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी अतुलनीय धाडस दाखवत पाकिस्तानमधून आलेल्या 9 दहशतवाद्यांना यमसदनाला धाडले होते. सहाय्यक उपनिरिक्षक तुकाराम ओंबळे यांनी कसाबवर झडप घालून त्याला पकडून ठेवले. या घटनेत त्यांनी प्राण गमावले. मृत्यू होवूनही ओंबळे यांनी कसाबवरील पकड सुटू दिली नव्हती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कसाबने पाकिस्तानमधून आल्याचा कबुली जवाब दिला होता. ओंबळे यांनी दाखविलेल्या धैर्यामुळेच दहशतवाद्याची मूळे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेपर्यंत पोहोचल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा -सत्तापेच LIVE :अजित पवारांनी दिला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, मुख्यमंत्री फडणवीस थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद

हे प्रमुख पोलीस अधिकारी दहशतवाद्यांशी लढताना झाले शहीद-
दहशतवाद प्रतिबंधक विभागाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे, एनकाउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर, एन. एस. जी कमांडो अधिकारी मेजर संदीप उन्नीकृष्णन हे प्रमुख अधिकारी शहीद झाले. 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड समजल्या जाणाऱ्या मसूद अझहरला ताब्यात देण्याची मागणी वारंवार केली आहे. मात्र, पाकिस्तानने आजतागायत त्याला पाठिशी घातले आहे.

Last Updated : Nov 26, 2019, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details