मुंबई -आघाडी सरकारचे मंत्री अनिल परब यांना तुरुंगात जावं लागणार असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी दिला आहे. दापोली येथील अनधिकृत बंगला, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अनिल परब यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. यासंबंधीची तक्रार आपण केली असून, त्यानंतर ही कारवाई सुरू झाली असल्याचं किरीट सोमैया यांनी सांगितले.
हेही वाचा -शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थावर ईडीचा छापा; चौकशी सुरू...
तसेच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता. आज वाशिममध्ये ईडीडून भावना गवळी यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. आघाडी सरकारच्या एकूण अकरा नेत्यांवर अटकेची कारवाई होईल, असे भाकीत किरीट सोमैया यांनी केले आहे.
- शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर ईडीचा छापा