मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मलबारहिल (Malabar Hill) येथील (Avadhut bungalow) 'अवधूत' बंगल्याचा, सदोष विद्युतप्रणालीमुळे वीज पुरवठा खंडित (CM Home Electrical Power Cut) झाला आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे कार्य बेस्ट कंपणी कडून युद्धपातळी सुरू आहे. मात्र, किमान दोन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्याचे 'अवधूत' या मलबारहिल येथील शासकीय निवासस्थानी राहतात. बेस्ट कंपणी कडून या बांगल्याला वीज पुरवठा केला जातो. या भागातील बेस्टची विद्युत वाहिनीची वायर जळाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला होणारा वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुमारे २०० मीटरवरून, तात्पुरत्या स्वरूपात बेस्ट कडून बंगल्याला वीज उपलब्ध करुन दिली आहे. जळालेली विद्युत वाहिनी पूर्ववत करण्यासाठी किमान दोन दिवसांचा अवधी लागणार आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे कार्य बेस्ट कंपणी कडून युद्धपातळी सुरू आहे, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली.
CM Home Electrical Power Cut : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचा वीज पुरवठा खंडित - Mumbai
मुंबई येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मलबारहिल (Malabar Hill) येथील (Avadhut bungalow) 'अवधूत' बंगल्याचा, सदोष विद्युतप्रणालीमुळे वीज पुरवठा खंडित (CM Home Electrical Power Cut) झाला आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे कार्य बेस्ट कंपणी कडून युद्धपातळी सुरू आहे. मात्र, किमान दोन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना, मुख्यमंत्री शिंदे यांच्या जीवाला धोका होता, असा आरोप शिंदे गटाकडून केला जातो आहे. अशातच बेस्टच्या विद्युतवाहिनीत सदोष निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. बेस्ट महापालिकेच्या आख्यारीत येते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.