महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी लवकरच निवडणूक

राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणुक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूकीचे मतदान व मतमोजणी एकाच दिवशी (4 ऑक्टोंबर)रोजी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

By

Published : Sep 14, 2021, 10:04 PM IST

मुंबई - राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणुक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीचे मतदान व मतमोजणी एकाच दिवशी (4 ऑक्टोंबर)रोजी होणार आहे. यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्राधिकार पत्रांसाठी (23 सप्टेंबर)पर्यंत शिफारस पत्रे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय येथे सादर करावीत, असे आवाहन मुख्य निवडणुक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धी माध्यमांच्या प्रितिनिधींनी आपले नावे नोंदवा

या निवडणुकीसाठी मतदान, मतमोजणीचे वृत्तसंकलन आणि छायाचित्रण करण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणुक आयोगाची विहित प्राधिकारपत्रे प्रथम प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रितिनिधींनी पोटनिवडणूकीच्या प्राधिकारपत्रांसाठी आपले नावे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र दोन प्रतींसह महासंचालक, माहिती व जनसंपर्क, महासंचालनालय मंत्रालय, मुंबई येथे (23 सप्टेंबर 2021)पर्यंत पाठवावीत, असे आवाहन केले आहे.

छायाचित्रांच्या छायांकीत प्रती स्विकारल्या जाणार नाहीत

प्रत्येक शिफारस पत्रासोबत पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्र असणे आवश्यक आहे. एकाच व्यक्तीला दोन्ही केंद्रात प्रवेश हवा असल्यास, तीन प्रतींसह सादर करावीत. छायाचित्रांच्या छायांकीत प्रती स्विकारल्या जाणार नाहीत. प्राधिकारपत्रे द्यावयाच्या व्यक्तींची संख्या मर्यादित असावी अशी, माहिती मुख्य निवडणुक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details