मुंबई -मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session 2021) पहिल्याच आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक (speaker election process) आवाजी मतदानाने होण्याची शक्यता आहे. पहिल्याच आठवड्यात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक व्हावी, यासाठी काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली होती.
22 ते 28 डिसेंबरला दरम्यान होणार हिवाळी अधिवेशन -
विधानसभा अध्यक्षाची निवडणूक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात व्हावी. यासाठी काँग्रेस (Congess Insistent For speaker post election) आग्रही आहे. 22 ते 28 डिसेंबरला मुंबई हिवाळी अधिवेशन होणार असून पहिल्या आठवड्यात 22, 23 आणि 24 डिसेंबर रोजी कामकाज चालणार आहे. तर दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबर या दोन दिवस कामकाज चालणार आहे. या पहिल्याच आठवड्यात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गुप्त मतदान पद्धतीने विधानसभा अध्यक्षची निवड केली असती तर, महाविकास आघाडी सरकारला दगाफटका होण्याची भीती होती. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड आवाजी व्हावी, यासाठी या आधीपासून महाविकास आघाडी सरकार आग्रही होते.