मुंबई शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा वाद ( Shiv Senas Bow and Arrow Symbol ) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे. आयोगाकडे शिवसेनेने कागदपत्रे सादर करण्यास चार आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र, आयोगाने ती मागणी फेटाळून ( Commission Rejected Demand of Shiv Sena ) लावत, केवळ १५ दिवसांचा अवधी दिला ( Supreme Court ) आहे. शिवसेनेला या दिवसांत कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत. मात्र, आयोग चिन्हांबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्ष आणि चिन्हावर शिंदे गटाचा दावा (Shinde Group Claim Over Shivsena Party )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना कोणाची हा वाद रंगला आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाकडून सुनावणीसाठी तारखा दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे. लोकसभा आणि राज्यसभेत शिंदे गटाकडे संख्याबळ आहे. शिवसेना पक्ष आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावे, अशी मागणी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी १९ जुलै रोजी निवडणूक आयोगाकडे केली होती. बंडखोर शिंदे गटाच्या दाव्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना आणि बंडखोर नेत्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.