मुंबई- शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्ह वादावर निवडणूक आयोगाने (Election commission) तोडगा काढताना ठाकरे गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि मशाल हेनिवडणूक चिन्ह दिले. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले. मात्र, चिन्हासाठी सकाळी १० वाजेपर्यंतची वेळ दिली Shinde Group Election Symbol आहे. निवडणूक आयोगाच्या यादीत नसलेली आणि धार्मिकतेचे प्रतिक दर्शवणारी 'गदा' ही निशाणी शिंदे यांनी मागितली होती. तसेच ठाकरे गटाने मागितलेले दोन चिन्ह शिंदेंनी मागितल्याने निवडणूक आयोगाने नव्याने चिन्ह देण्याचे आदेश दिले Shinde group new election symbol आहेत.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीने निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्रे जमा करण्यात आली होती. त्यावर निवडणूक आयोगाने सोमवारी निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल या चिन्हाची मागणी केली होती. हे धार्मिक चिन्ह असल्याने देता येत नाही. तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूतील पक्षाचे चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे यांनी दिलेली तिन्ही चिन्हे निवडणूक आयोगाने नाकारली.
Shinde Group Election Symbol : शिंदे गटाला नव्या चिन्हासाठी दहा वाजेपर्यंतची मुदत - उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्ह वादावर निवडणूक आयोगाने (Election commission) तोडगा काढताना ठाकरे गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह दिले. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले. मात्र, चिन्हासाठी सकाळी १० वाजेपर्यंतची वेळ दिली Shinde Group Election Symbol आहे.
एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे यांनी दिलेली समान दोन चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिली. तर तिसरे चिन्ह गदा मागण्यात आले. मात्र, धर्माशी निगडित असल्याने एकनाथ शिंदे गटाला गदा हे चिन्ह नाकारण्यात आले. ठाकरे गटानेही या चिन्हाचा पर्याय दिला होता. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ३ नवे पर्याय देण्याचे आदेशही आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले (Shinde group new election symbol)आहेत.
Last Updated : Oct 11, 2022, 9:43 AM IST