ठाणे -शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा मोठा गट फोडल्यानंतर शिवसैनिक कमालीचे संतप्त झाले आहेत. उल्हासनगरमधील गोल मैदान भागात असलेले शिवसेना खासदार व एकनाथ शिंदेंचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले. शिवसैनिक त्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक होऊन घोषणाबाजी करत कार्यलयची तोडफोड केली आहे. तर डोंबिवली भागातही शिंदेंच्या एका कार्यलयाच्या फलकावर काळे फासण्यात आले.
एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले - महाविकास आघाडीवर संकट
शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी पक्षाचा मोठा गट फोडल्यानंतर शिवसैनिक कमालीचे संतप्त झाले आहेत. उल्हासनगर मधील गोल मैदान भागात असलेले एकनाथ शिंदेंचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांचे कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले ( Shiv Sainiks broke Shrikant Shinde Office ) आहे. शिवसैनिक त्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक होऊन घोषणाबाजी करत कार्यलयची तोडफोड केली आहे.
ठाणे जिल्ह्यात शिवसैनिकांच्या आक्रमक प्रतिक्रिया -एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवनेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. कालपासून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि शिवसैनिकांच्या दोन बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्या. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन केले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता शिवसैनिकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी ठाणे जिल्ह्यात आक्रमक प्रतिक्रिया दिसू लागल्या होत्या. खासदार शिंदेचे कार्यलय तोडफोड ही त्याचीच परिणीती आहे. पासून काल राज्य भरातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठिकठिकाणी घोषणाबाजी करत पोस्टरला काळे फासत आंदोलन केले होते. आता कल्याण लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार असलेले डॉ. श्रींकांत शिंदे यांचे कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले आहे. शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. त्यांनी खासदार शिंदेच्या कार्यालयावरील फकल फोडून काचांची तावदाने फोडून टाकली आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांची जादा बंदोबस्त वाढत काही शिवसैनिकांना ताब्यात घेऊन त्यांना उल्हासनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.