गुवाहाटी - महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेचे खच्चिकरण केले आहे. आमदारांच्या संरक्षणाची जवाबदारी राज्य सरकरावरआहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने आमची सुरक्षा काढल्याचा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन केला.
काय लिहिले आहे पत्रात -एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालकांना खरमरीत पत्र लिहुन नाराजी व्यक्त केली. आम्ही आमदार असून सरकारने आम्हाला व कुंटुंबीयांना पुरवलेली सुरक्षा सूडभावनेतून काढून घेतल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. त्यामुळे कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गुंड आमच्या कुटुंबीयांना धमक्या देत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या धमक्यांमुळे आमच्या जीवाला धोका वाढला आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचे एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
संजय राऊतांनी धमक्या दिल्याचा आरोप -माध्यमांशी बोलताना बंडखोर आमदार मुंबईत आल्यावर पाहू. त्यांना राज्यात फिरणे कठीण होईल, अशी धमकी संजय राऊत यांनी दिल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. याबाबत महाविकास आघाडीचे नेते कुटुंबीयांनाही धमकी देत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. याबाबत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
शरद पवार, आदित्य ठाकरेंवरही केले आरोप -महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कुटुंबीयां सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्याकडून आमच्या कुटूंबीयांना धमक्या येत आहेत. सुरक्षा काढून घेतल्यामुळे आमचे कुटुंबीय आणि नातेवाई धास्तावले आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला काही बरेवाईट झाल्यास त्याची सगळी जवाबदारी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीतील नेते जवाबदार असतील असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला.
पंजाबसारखी घटना घडण्याची शक्यता -सुरक्षा रक्षक हटवल्याने पंजाबमध्ये हत्याकांड घडले होते. त्यामुळे सुप्रसिद्ध गायकाचा खून करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील आमदारांची सुरक्षा व्यवस्था काढल्याने अशा घटना घडण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोपही शिंदे यांनी आपल्या आरोपात केला आहे.