मुंबईशिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे Vinayak Mete death in accident यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. बीडमध्ये त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. दुपारी ४ वाजता मेटे यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार होईल, अशी माहिती शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी Shivsangram Sanghata on Vinayak Mete दिली.
विनायक मेटेंचा अपघाती मृत्यूशिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे ५ वाजता मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात मेंदूला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मेटेंच्या अपघाती मृत्यूने सर्वच स्तरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले Vinayak Mete death probe आहेत. तपासाकरिता टीमही तैनात केल्या आहे. मेटे यांच्या गाडीचा ड्रायव्हर एकनाथ कदम याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात अनेक आंदोलन उभी केली. अखेरपर्यंत मराठा आरक्षणासाठी लढत राहिले. अखेरचा मृत्यूही मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी येत असताना झाल्याने मराठा समाजात शोक व्यक्त केला जातो आहे.
तीन वाजता अंत्यसंस्कारविनायक मेटे यांचे पार्थिव मुंबईतून बीड शहरात मध्यरात्री आणले आहे. ते शिवसंग्राम कार्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अंत्यदर्शन झाल्यानंतर त्यांची अंतिमयात्रा अण्णाभाऊ साठे मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असलेल्या विनायक मेटे यांच्या शेतात जाणार आहे. त्या ठिकाणी मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. स्थानिक प्रशासनाकडून याची तयारी सुरू झाली आहे. सुमारे तीन ते साडेतीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. दुपारी १ वाजता औरंगाबादला पोहचतील. त्यानंतर बीडला अंत्यविधीसाठी Funeral of Vinayak Mete उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे.
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पनवेलजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. पहाटे झालेल्या या अपघाताची बातमी समजताच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पनवेल येथे एमजीएम रुग्णालयात जाऊन विनायक मेटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले Vinayak Mete passed away in Accident पनवेलमधील रुग्णालयातून विनायक मेटे यांचे पार्थिव त्यांच्या मुंबई येथील वडाळा परिसरात असलेल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी या निवासस्थानी येऊनं त्यांचे अंत्यदर्शन घेतले.