महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Manisha Kayande : एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि शिवसैनिक भाजपाच्या दावणीला बांधायचे आहे - मनीषा कायंदे - शिवसैनिक भाजपाच्या दावणीला

शिवसेना कोणाची यासाठी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाची कायदेशीर लढाई सुरू आहे ( legal battle between Shiv Sena and Eknath Shinde group ). आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला कोणताही ठोस निर्णय घेण्याचे आदेश दिले ( Supreme Court ordered Election Commission to take decision ) आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाकडे शिवसेना अगदी सकारात्मकतेने बघत आहे. दोन दिवस झालेल्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांना कायद्याला धरून कोणताही संदर्भ देता आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) या सर्व प्रकरणाची अत्यंत गंभीरतेने दखल घेतली आहे.

Manisha Kayande
मनीषा कायंदे

By

Published : Aug 4, 2022, 3:11 PM IST

Updated : Aug 4, 2022, 5:08 PM IST

मुंबई - शिवसेना कोणाची यासाठी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाची कायदेशीर लढाई सुरू आहे ( legal battle between Shiv Sena and Eknath Shinde group ). आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला कोणताही ठोस निर्णय घेण्याचे आदेश दिले ( Supreme Court ordered Election Commission to take decision ) आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाकडे शिवसेना अगदी सकारात्मकतेने बघत आहे. दोन दिवस झालेल्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांना कायद्याला धरून कोणताही संदर्भ देता आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) या सर्व प्रकरणाची अत्यंत गंभीरतेने दखल घेतली आहे.

आम्ही अजून शिवसेनेतच -आम्ही अजून शिवसेनेतच आहोत असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न एकनाथ शिंदे गटाचा ( Eknath Shinde group ) न्यायालयात सुरू आहे. मात्र परिच्छेद 10 ला देखील मान्य करायला तयार नाहीत. एकनाथ शिंदे गटाला केवळ शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह फडकवायचे आहे. शिवसैनिक आणि शिवसेना ही भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधून शिवसेना संपवायचा डाव एकनाथ शिंदे यांचा असल्याचा आरोप शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे ( Shiv Sena spokesperson Manisha Kayande criticize Shinde group ) यांनी केला आहे. पोलीस महासंचालकांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला.



सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी शिवसेना -सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी प्रकरणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अगदी निश्चिंत आहेत. शिवसेना आणि पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. शिवसेना पक्ष सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी काम करत आलेला आहे. अशी माहिती आजच्या सुनावणीवर खासदार विनायक राऊत यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयात आम्हाला नक्की न्याय मिळेल. त्यामुळे या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. या मंत्रिमंडळ विस्तार आधीच या सर्व बंडखोर नेत्यांचे अरबी समुद्रात विसर्जन करू असा खोचक टोला विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांनी लगावला आहे.

हेही वाचा -Maharashtra Cabinet Expansion : 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; वाचा भाजप-शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी

Last Updated : Aug 4, 2022, 5:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details