मुंबई - एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) गट आणि शिवसेना यांच्यातील वाद दिवसंदिवस अजूनच प्रखर होत चालला आहे. शिवसेना ( Shivsena ) आपणच आहोत, यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. तर पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून बैठका आणि चर्चा सत्र सुरू झालं आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे "निष्ठा यात्रा" आणि "संवाद यात्रा" काढत आहेत. यासोबतच दोन्ही गटाकडे आपले कार्यकर्ते राहावे, यासाठी शकला व थेट प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहेत. बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जात आहे. मात्र, त्यात पदाधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेत देखील एक संभ्रमाचे वातावरण आहे. शिवसेना नेते रामदास कदम ( Shiv Sena leader Ramdas Kadam ), नेते शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार संजय बांगर अशा अनेकांची हाकलपट्टी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र, त्यांचे पुनर्नियुक्ती एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्याचे काम सुरू आहे.
प्रतिज्ञा पत्राचं महत्त्व काय? - एकदाच शिंदे यांनी बंडखोरी करून आपल्या सोबत शिवसेनेचे 40 आमदार घेऊन गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला आपली सत्ता तर सोडावी लागली. मात्र, यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना जाण्याचीही भीती आहे. एकनाथ शिंदे आपलीच शिवसेना ही मूळ शिवसेना असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी कायदेशीर लढाईची देखील तयारी सुरू केली आहे. पक्षावर आपला हक्क सांगायचा असेल, तर पक्षात उभी फूट दाखवावी लागेल. केवळ 40 आमदार आणि 12 खासदार सोबत येऊन पक्षावर दावा ठोकता येणार नाही. त्याची पूर्ण कल्पना एकनाथ शिंदे गटाला आहे. त्यामुळे जास्तीत- जास्त पक्षाचे पदाधिकारी हे आपल्या सोबत असले पाहिजेत यासाठी दोन्हीकडून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे हे पक्षाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. हे दाखवण्यासाठी त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतली जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून झालेला बंडानंतर सर्वात आधी शिवसेनेने आपल्या सोबत असलेल्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून देखील जे पदाधिकारी शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटाकडे आल्या अशा सर्व पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे. ज्यावेळेस निवडणूक आयोग किंवा न्यायालयमध्ये पक्षाचे पदाधिकारी सगळ्यात जास्त कोणाच्या बाजूने आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याचे मत कायदेतज्ञ नितीन सातपुते यांनी व्यक्त केला आहे. तसेच हकालपट्टी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती इतर नेत्यांच्या माध्यमातून तेली जात असणार आहे. त्या पक्षाच्या घटनेत नियुक्त बाबत आदेश देण्याचे अधिकार कोणाकडे आहेत हे देखील तपासले जातील. आणि त्यानंतरच्या नियुक्त वैद्य आहेत, की अवैध ते ठरवले जाईल असे मतही नितीन सातपुते यांनी व्यक्त केले आहे.