मुंबई - शिवसेनेला खिंडार पाडणाऱ्या एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर झालेल्या संवादात थेट म्हटलंय की, तुमचं तुम्ही बघा, माझं मी पहातो. शिंदेंच्या या वक्तव्याने शिवसेनेतील असंतोष कमालीचा वाढला असल्याचंच स्पष्ट होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांचे दूत म्हणून सूरतला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी शिंदे यांचे ठाकरेंशी फोनवरून बोलणे करून दिले. त्यावेळी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी रातोरात गुजरातचा रस्ता धरला. तिथे ते भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे कळते. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दूत म्हणून मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक घाईघाईने सूरतला पोहोचले.
फोनवरून मुख्यमंत्र्यांशी संवाद - मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी प्रथम चर्चा केली. त्यानंतर आपल्याच फोनवरून उद्धव ठाकरे यांना फोन लावत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद करून दिला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदे बरेच संतापले होते असे सुत्रांचे म्हणणे आहे. शिंदे यावेळी मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, एकीककडे मला गटनेतापदावरून काढल, का? आमदारांच्या अपहरणाचा आरोपही केला, त्याचवेळी चर्चाही करत आहात, असं का?