मुंबई : मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिंदे गटावर केला जातो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आरोपाला सडेतोड उत्तर ( Eknath Shinde Slap ) दिले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजीरमध्ये अडकलेल्यांनी ( Trapped in Chains of NCP ) खंजीरची भाषा करू नये, ( Not Speak Language of Daggers ) असा वर्मी घावच शिंदे यांनी घातला आहे. तसेच पाठीत खंजीर कोणी खुपसला हे योग्य वेळ आल्यावर मी सांगेन, असा सूचक इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांना दिला आहे. यातून शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका :एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. शिंदे यांनी बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि शिंदे गट असा वाद यामुळे रंगला आहे. तर दुसरीकडे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावरून शिंदे गटावर चौफेर टीका केली.
बाळासाहेबांचे नाव, फोटो लावू नका : शिंदे गट बंडखोर नाहीत हरामखोर आहेत. शिवसेना त्यांना संपवायची आहे. ठाकरे आणि शिवसेना हे नाते तोडायचे आहे. परंतु, तुमच्यात हिम्मत असेल, तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. तुमच्या हिमतीवर मत मिळवा, प्रत्येकाला आई-वडील प्यारे असतात. जे फुटून गेलेले आहेत, सुदैवाने त्यांचे आई-वडील सोबत आहेत. त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्यावी आणि मते मागावीत, असा हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.