मुंबई:एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. फडणवीस आणि शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. दहा दिवसांपासून हा सत्तासंघर्ष सुरू होता. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी राजीनामा दिला. त्यानंतर आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील अशीच शक्यता वर्तवण्यात येत असताना ही घोषना झाली. अनेक कारणासाठी शिंदेच्या रुपाने भाजपला ब्रम्हास्त्र मिळाले आहे.
मराठी अस्मितेचे कार्ड:बंडाच्या काळात शिवसेना विशेषत: संजय राऊत हे बंडखोरां सोबतच भाजपवर जोरदार टीका करत होते. यावेळी त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा काढत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मराठीचा द्वेश करतात असे भासवले होते. त्याच बरोबर शिंदेंच्या बंडामुळे सर्वसामान्य जनता आणि शिवसैनिक आणि पदाधीकारी तसेच आजही उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मानत असलेल्यां मधे शिवसेने बाबत मोठी सहानुभुती निर्माण होईल आणि त्याचा फटका भाजपला आगामी काळात बसू नये याची काळजी घेत भाजपने शिंदेंच्या रुपाने एक कार्ड समोर केल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे मराठी अस्मितेसह आगामी काळात शिवसेनेला सहानुभुती मिळुनये ही खेळी साध्य केली आहे.
शहांना खोटे ठरवल्याचा वचपा:शिवसेना आणि भाजपने युतीत निवडणुक लढली आणि बहुमताच्या आकडाही पार केला. पण शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला. सरकार आल्यानंतर शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले जाईल असे अश्वासन गृहमंत्री अमीत शहा यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत बसुन दिल्याचा दावा शिवसेनेने केला होता. आणि याच गोष्टीचा वारंवार पुर्नउच्चार करत शहां आणि भाजपला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. भाजपला या प्रकाराचा मोठा राग होता. शिवसेनेचा वचपा काढण्याची संधी साधत भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री पद बहाल केल्याचे सांगितले जात आहे
शिंदेंच्या बंडांत शिवसेनेचा मोठा वाटा :भाजपला सत्तेत येण्यासाठी सुमारे 25 आमदारांच्या गटाची आवश्यकता होती. शिंदेंच्या बंडात मात्र 50 च्यावर आमदार सहभागी झाले. एवढ्या सगळ्यांना सामाऊन घेणे आणि त्यांना सत्तेचा वाटा देणे या प्रक्रियेत पुन्हा नाराजांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नव्हती उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला झटका देताना पुन्हा नाराजीनाट्याचा घोळ होऊ नये याची पुरेपुर काळजी घेत भाजपने एक नवा डाव आखला आणि शिंदेंना मुख्यमंत्री पद देत सगळ्यांनाच धक्का दिल्याचे मानले जात आहे.
मुंबई पालीका निवडणुक:मुंबई सह महाराष्ट्रातील अनेक महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातुन हिसकावण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याची तयारीही आधिच सुरु झालेली आहे. येत्या निवडणुकीत शिंदे यांच्या रुपाने शिवसेनेची ताकद आपल्याकडे वळवण्यासाठी आणि सत्तेच्या या घडामोडीचा शिवसेनेला फायदा होऊ नये हे पाहता भाजपने शिंदेंना मुख्यमंत्री पदासह बाहेरुन पाठिंबा देत सरकारच ताब्यात दिल्याचा फायदा महापालिकेच्या निवडणुकांत होउ शकतो हे पाहता भाजपने ही खेळी खेळल्याचे जाणकारांचे मत आहे.
शिवसेनेच्या मतांच्या विभागणीचा प्रयत्न:आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये खरी शिवसेना कोणाची आणि मोठी शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले गेले असावे. यानिमित्ताने शिवसेनेत फूट पडली असून आता मतांची विभागणी निश्चित होईल आणि त्याचा फायदा आगामी निवडणुकीत भाजपाला मिळू भाजपा स्वबळावर सत्तेत येऊ शकते असा प्रयत्न यानिमित्त नही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. -भारतकुमार राऊत, माजी खासदार