मुंबई -स्वच्छता अभियान २ची सुरुवात ( Start of cleanliness drive ) आज मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर ( YB Chavan Centre Mumbai ) येथे करण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ( Eknath Shinde ) त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( Deputy Chief Minister Devendra Fadwanis ) यांनी या कार्यक्रमाबद्दल माहिती देत स्वच्छतेबाबत राज्याने काय करायला हवे असे सांगत, आतापर्यंत यामध्ये आपण मागे कसे राहिलो हे सांगत असताना मागच्या महाविकास आघाडी सरकार ( Maha Vikas Aghadi Govt ) विशेष करून मुंबई महानगरपालिकेवर ( Mumbai Municipal Corporation ) सत्तेत असलेल्या शिवसेनेवर ( Criticism of Shiv Sena ) हल्लाबोल केला आहे.
९० दिवसात मुंबई खड्डे मुक्त करणार!याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत असलेल्या खड्ड्यांमुळे नाहक मुंबई व त्याचबरोबर सरकारची बदनामी होत आहे. परंतु यासाठी आता नवीन प्लॅनिंग तयार केले गेले असून ९० दिवसात मुंबईतील सर्व खड्डे ( Mumbai pothole free ) भरले जातील असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. वास्तविक दरवर्षी थोड्या थोड्या रस्त्यांचं काँक्रीटीकरण होत असल्याचं आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सांगितल्यावर यंदा ४५० किलोमीटर रस्त्यांचं पूर्ण कॉंक्रिटीकरण केलं जाईल, असेही ते म्हणाले. यासाठी साडेपाच हजार कोटी खर्च येणार असून सर्व रस्त्यांचं मार्चपर्यंत काँक्रिटीकरण केले जाईल असेही ते म्हणाले. तसेच दोन वर्षाने रस्त्यात खड्डा दिसणार नाही असं सांगत, सरकारची मानसिकता लोकांना न्याय द्यायची असते. हे काम सोपं होतं, परंतु हे काम अगोदर झालं नाही. कदाचित हे काम आमच्या हातून होणार होतं, म्हणूनच आम्ही सरकारमध्ये आलो असं हे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर बोचरी ( Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray ) टीका केली आहे.