मुंबई -उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती. ती आम्ही देत आहे. एकनाथ शिंदे हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज सायंकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे म्हणून शपथ घेतील. आणखी कोही लोक आमच्या संपर्कात आहेत, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली ( Eknath Shinde Maharashtra New CM ) आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकार देणं गरजेचं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्षांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहे.