मुंबई :महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ ( Reversal in The Politics of Maharashtra ) होत असताना नवनवीन घडामोडी समोर येताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे( Rebel Leader Eknath Shinde ) यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ ( Vice President Narhari Jirwal ) यांना ३४ आमदारांच्या समर्थनाचे पत्र ( Letters of Support From MLA ) पाठवलं आहे. सात पानी पाठवलेल्यापत्रामध्ये ३४ आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत.
३४ आमदारांचे समर्थन : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर नक्की त्यांच्याबरोबर किती आमदार संपर्कात आहेत. याची जुळवाजुळव केली जात असतानाच एकनाथ शिंदे यांनी ३४ आमदारांच्या समर्थनाचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवून या प्रश्नाला पूर्णविराम दिलेला आहे. या सात पानी पत्रात ३४ आमदारांनी स्वतः त्यांची नावे लिहून त्यापुढे स्वाक्षरी केलेली आहे.
प्रतोदपदी भरत गोगावले : एकीकडे शिवसेनेचे विधिमंडळ प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेना आमदारांना जारी केलेला व्हीप हा बेकायदेशीर असून, तो आम्हाला मान्य नाही, असे शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष यांना सांगितलेले आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी ( Chief Representative of MLA Bharat Gogavale ) निवड केली आहे, अशा आशयाचं ट्विटसुद्धा त्यांनी केलेले आहे. या सर्व घडामोडी होत असताना नक्की एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ किती आमदार त्यांच्यासोबत गुवाहाटी येथे आहे, याचा अंदाज बांधणे सर्वच राजकीय पक्षांना कठीण झाले असताना आता एकनाथ शिंदे यांनी त्या सर्व आमदारांच्या समर्थनाचे पत्र उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवून हा प्रश्न संपुष्टात आणलेला आहे.
https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-eknathshindeletter-7210570_22062022162931_2206f_1655895571_18.jpg आमदार नितीन देशमुख यांचेही नाव व स्वाक्षरी : विशेष महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले अकोल्याचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी पुन्हा नागपुरात आल्यानंतर त्यांना जबरदस्तीने तिथं नेलं होतं व तसेच ते कट्टर शिवसैनिक असून ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहतील, असेही त्यांनी सांगितलं आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी ज्या ३४ समर्थक आमदारांचे पत्र नरहरी झिरवळ यांना पाठवले आहे. त्यामध्ये नितीन देशमुख यांचेही नाव व त्यांची स्वाक्षरी असल्याने आता यावर पुन्हा प्रश्नच निर्माण झाला आहे.
हेही वाचा :Letter To Governor : एकनाथ शिंदे विधीमंडळ पक्षप्रमुखपदी कायम, बंडखोर आमदारांनी राज्यपालांना लिहिले पत्र