महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aarey Car Shed : मुख्यमंत्री शिंदेंच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मेट्रोचे कारशेड आरेमध्ये बनवण्याचा निर्णय - मेट्रोचे कारशेड आरेमध्ये बनवण्याचा निर्णय

भाजप युती सरकार काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो ३ चे कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला. रातोरात येथील झाडांची कत्तल करण्यात आली. पर्यावरणवाद्यांनी याला तीव्र विरोध केल्यानंतर शिवसेनाही आरे विरोधात उभी राहिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेवर येताच आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. तसेच पर्यावरणाची हानी झाल्याने आरेतील कारखेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र या जागेच्या मालकीवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद झाला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. कांजूरमार्ग येथील कारशेडचे काम स्थगित आहे. ( Eknath Shinde government decision on Metro Aarey car shed )

Aarey Car Shed
मेट्रोचे कारशेड आरेमध्ये बनवण्याचा निर्णय

By

Published : Jul 1, 2022, 3:47 PM IST

Updated : Jul 1, 2022, 4:09 PM IST

मुंबई - बहुचर्चित कुलाबा वांद्रे शिफ्ट मेट्रो तीन कारशेड प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कार्डशेडचा मार्ग कांजूरमार्गकडे वळवला. मात्र राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच, पुन्हा मेट्रो कारशेड आरेत बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महाधिवक्तांना न्यायालयात सरकारची भूमिका मांडण्याचे निर्देश दिले आहेत. ( Eknath Shinde government decision on Metro Aarey car shed )

उद्धव ठाकरेंचे आवाहन -मेट्रो शेड प्रकल्पाची जागा बदलण्याबाबत झालेल्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनीही आपले मत मांडले. गुरुवारी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पहिली कॅबिनेट घेतली. या बैठकीत त्यांनी आरे येथील मेट्रो कार शेड व जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात करा, असे आदेश दिले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, "माझा राग मुंबईकरांवर काढू नये. मेट्रो शेडच्या प्रस्तावात बदल करू नका. मुंबईच्या वातावरणाशी खेळू नका. आम्ही कंजूर मार्गचा पर्याय सुचवलेला आहे तोच पुढे चालू ठेवा. आता तर केंद्रात आणि राज्यात देखील तुमचंच सरकार आहे." सविस्तर बातमी वाचा

हेही वाचा -Kanjurmarg Metro Car Shed land : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारची, जिल्हाधिकाऱ्यांची कोर्टात माहिती

राज्यात शिवसेना - भाजप युती सरकार काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो ३ चे कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला. रातोरात येथील झाडांची कत्तल करण्यात आली. पर्यावरणवाद्यांनी याला तीव्र विरोध केल्यानंतर शिवसेनाही आरे विरोधात उभी राहिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेवर येताच आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. तसेच पर्यावरणाची हानी झाल्याने आरेतील कारखेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र या जागेच्या मालकीवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद झाला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. कांजूरमार्ग येथील कारशेडचे काम स्थगित आहे.

हेही वाचा - कांजूरमार्गची जागा नेमकी कुणाची? मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित जागेवर आणखी एकाचा मालकी दावा

हेही वाचा -Radhakrishna Vikhe Patil : विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव चर्चेत

पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय -राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवड झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मेट्रो -३ चे कारशेड आरेमध्ये बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच न्यायालयात आरेच्या बाजूने भूमिका मांडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाधिवक्ता कुंभकोणी यांना दिले आहेत.

मुंबईचं फुफुस अशी आरेची ओळख -आरे जंगल हे मुंबईच्या अगदी मध्यभागी असून संपूर्ण मुंबईला ऑक्सिजन पुरवठा करण्याची क्षमता आरेमध्ये आहे. इतक विस्तीर्ण पसरलेले जंगल असल्याने या जंगलाला मुंबईच फुफुस असे देखील म्हटले जाते. इथे जैवविविधता देखील मोठ्या प्रमाणात आढळते. मेट्रोसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यास जैवविविधता धोक्यात येऊ शकते.

जागेचा मालक कोण - मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सिपझ) कारशेडच्या जागेचा तिढा सुटता सुटत नसताना हा तिढा आणखी वाढत चालला आहे. कारण कांजुरमार्गच्या 1600 एकर जागेवर केंद्र सरकार, राज्य सरकार, गरूडिया बिल्डर असे 10 ते15 जणांनी मालकी हक्क सांगितला आहे. त्यात आता आणखी एका मालकी हक्काच्या दाव्याची भर पडली आहे. राजेश रमणिकलाल खताडिया नावाच्या एका व्यक्तीने या जागेवर मालकी दावा केल्याची माहिती पर्यावरण प्रेमी झोरू बाथेना यांनी दिली आहे. असे किती दावे येणार आणि कांजूरचा वाद किती दिवस सुरू राहणार असा प्रश्न ही उपस्थित केला आहे. (सविस्तर वाचा...)

हेही वाचा -Heavy rain in Mumbai : मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते तुंबले, जनजीवन विस्कळीत

हेही वाचा -Landslide In Mumbai : मुंबईत पेडर रोडला दरड कोसळली, दोन इमारतीचे भागही कोसळले

Last Updated : Jul 1, 2022, 4:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details