मुंबई शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन Vinayak Mete Car accident झाले. या अपघाताची चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात मेटे यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी Maratha Reservation meeting आज मुंबईकडे निघाले होते. मुंबई पुणे मार्गावरील पनवेल येथील भातान भोगद्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळात मोठा शोक व्यक्त केला जातो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले.
बैठकीपूर्वीच त्यांचे दुर्दैवी निधनमराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने ते संघर्ष करत होते. नेहमीच ते आग्रही आणि एक तडफदार नेतृत्व होते. मराठा समाजाच्या संघर्षासाठी अनेक आंदोलने उभी केली. खरंतर ते चळवळीतले नेते होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष होते. मला तीन-चार दिवसांपूर्वी भेटले, त्यांचा एकच ध्यास होता. आता तुम्ही दोघे आहात, त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळेल, असे त्यांनी म्हटले होते. आज एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीपूर्वीच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. सरकार त्यांच्या मागण्यांचा नक्कीच विचार करेल, असे भावना मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde on Vinayak Mete death यांनी व्यक्त केल्या आहेत.
अपघाताची माहिती तपासून घेऊ चौकशी केली जाईलमेटे यांचा परिवार, पत्नीवर आणि शिवसंग्राम संघटनेवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत असे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विनायक मेटे यांचा अपघात होऊन घटनास्थळी वेळेवर मदत मिळाली नाही, असा आरोप केला जातो आहे. या संदर्भात माहिती तपासली जाईल आणि अपघाताची माहिती तपासून घेऊन, या घटनेची चौकशी केली जाईल. तसे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Vinayak Mete accident probe यांनी सांगितले.