महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde : 'मविआसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठी लढतोय' - एकनाथ शिंदेचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत शिवसैनिकांना भावनिक आवाहनं केलं आहे. मविआसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना अन् शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं ( Eknath Shinde On Shivsainik ) आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde

By

Published : Jun 25, 2022, 10:04 PM IST

Updated : Jun 25, 2022, 10:46 PM IST

मुंबई -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेच्या बंडामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे एकनाथ शिंदेवर सातत्याने टीकास्त्र करत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत शिवसैनिकांना भावनिक आवाहनं केलं ( Eknath Shinde On Shivsainik ) आहे. मविआसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना अन् शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं ( Eknath Shinde Criticized Mahavikas Aghadi ) आहे.

एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, 'शिवसैनिकांनो नीट समजून घ्या, मविआचा खेळ ओळखा. मविआसारख्या अजगाराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीत समर्पित,' असे भावनिक आवाहनं शिंदेनी केलं आहे.

राज्यात शिवसैनिक एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झालेलं पहायला मिळतं आहेत. काही ठिकाणी एकनाथ शिंदेचे पोस्टर फाडले जात आहेत. तर, आमदार तानाजी सावंत, दीपक केसरकर, श्रीकांत शिंदे, मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. तसेच, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर देखील कोल्हापुरात फाडण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी हे भावनिक ट्वीट केल्याचं मानलं जातं आहे.

मुख्यमंत्र्यांचा इशारा - बंडखोर आमदारांच्या गटाला 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' असे नाव दिलं आहे. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 'मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा आजतादायत केली नाही. इथून पुढेही करणार नाही. हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा -Rebel MLA Dilip Kesarkar Press : दिपक केसरकरांनी सांगितली शिवसेना आमदारांच्या बंडाची खदखदं, पाहा व्हिडिओ

Last Updated : Jun 25, 2022, 10:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details