मुंबई -शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी विधानसभेची वाटचाल बरखास्तीकडे ( Towards the dismissal of the Assembly ) असे ट्विट केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य ( Commentary on Eknath Shinde's rebellion ) केले. पंतप्रधान राज्यात आले आणि एकनाथ घेऊन गेले, असा निशाणा भुजबळ यांनी साधला. तसेच यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी शरद पवार ( Sharad Pawar ) चर्चा करत असल्याचे ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
पक्षात उभी फूट -महाविकास आघाडीच्या सरकारमधील प्रमुखपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आणि विधीमंडळाचे गटनेते एकनाथ शिंदे आणि बंड करत पक्षात उभी फूट पाडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान देत, राजकीय भूकंप घडवून महाविकास आघाडीला अडचणीत आणेल आहे. सरकार वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या जोर-बैठका वाढल्या असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकारची वाटचाल विधान सभेच्या बरखास्तीकडे असे ट्विट करत खळबळ उडवून दिली. या सर्व राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.
Eknath Shinde : पंतप्रधान तुकारामाला भेटायला आले, अन् एकनाथाला घेऊन गेले- छगन भुजबळ - मंत्री छगन भुजबळ
शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी विधानसभेची वाटचाल बरखास्तीकडे ( Towards the dismissal of the Assembly ) असे ट्विट केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य ( Commentary on Eknath Shinde's rebellion ) केले. पंतप्रधान राज्यात आले आणि एकनाथ घेऊन गेले, असा निशाणा भुजबळ यांनी साधला. तसेच यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी शरद पवार ( Sharad Pawar ) चर्चा करत असल्याचे ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मध्यवर्ती निवडणुका? - पंतप्रधान नरेंद्र मोदी पंढरपूरच्या दौऱ्यावर आले आणि एकनाथांना घेऊन गेले, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडावर केली. संजय राऊत यांचे ट्विट पाहिले मद्रास काय होते ते बघू. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या संदर्भात मार्ग काढण्यासाठी चर्चा करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मध्यवर्ती निवडणुकाना समोरे जाणार का.? असा प्रश्न विचारला असता, निवडणूका आज राहू दे उद्या लागू दे काही फरक पडत नाही कार्यकर्त्यांनी नेहमीच निवडणुकीसाठी तयार असायला हवं असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
हेही वाचा -उद्धव ठाकरे म्हणाले विधानसभा विसर्जित करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही - कमलनाथ