मुंबई -शिंदे - फडणवीस सरकारच्या ( Eknath shinde cabinet minister portfolios ) मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर काल झाला असून, आता या सर्वच मंत्र्यांकडे ( probable portfolio of cm eknath shinde ) कुठली खाती असणार याबाबत चर्चा ( shinde cabinet expansion ) रंगू लागली आहे. सूत्रांनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ( eknath shinde ministry portfolio ) नगर विकास व सामान्य प्रशासन ही खाती राहणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि वित्त ही खाती राहणार आहेत.
हेही वाचा -Mumbai rain - मुंबईत २४ तासांपासून पावसाची संततधार; गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता
महत्त्वाची खाती भाजपकडे? -शिंदे गटाच्या अपात्र आमदारांचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याकारणाने मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत आहे, असे सांगितले जात होते. परंतु, काल ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याअगोदरच मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे यावरून स्पष्ट झाले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा व मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नव्हता. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये गृह, वित्त, महसूल ही खाती कोणाकडे राहणार याबाबत एकमत नव्हते. अखेरकार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान करून भाजपने गृह, वित्त व महसूल ही महत्त्वाची खाती आपल्याकडे घेण्यात यश प्राप्त केले आहे.
मंत्र्यांना पुठील खाती मिळण्याची शक्यता -
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास विभाग व सामान्य प्रशासन.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वित्त, गृह ही खाती.
भाजप मंत्र्यांची संभावित खाती -
- राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल व सहकार ही खाती.
- सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ऊर्जा व वन ही खाती
- चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम
- विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास
- गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा
- सुरेश खाडे यांच्याकडे सामाजिक न्याय
- रवींद्र चव्हाण यांच्याकडे गृहनिर्माण