मुंबई - विधान परिषद निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणाने वेगळेच वळण घेतले. कालपर्यंत शिवसेनेचे दांडगे समर्थक आणि पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी पक्षालाच दगा दिला. शिंदे यांनी पक्षाशी असलेल्या नाराजीमुळे थेट भाजप शासित सुरत गाठून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यांचे बंड आता सरकार पाडणार की काय? असा प्रश्न उपस्थित करत आहे. यामुळे आघाडीतील पक्षांमध्ये देखील धाकधूक आहे. अचानक घेतलेल्या या वळणाने राज्यात भूकंप आणले. नाराज एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन बाहेर पडल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या आहेत. आतापर्यंत काय काय झाले याची थोडक्यात माहिती आम्ही तुमच्यापुढे मांडत आहोत.
1) आमदार संपर्काबाहेर -विधानपरिषदेची निवडणुकीत मतांची फाटाफूट झाल्याने शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात नाराजी होती. मात्र, या निवडणुकीनंतर राजकारणाने वेगळेच वळण घेतले. शिवसनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी सायंकाळपासून नॉट रिचेबल असल्याचे समजले. त्यांच्यासोबत डझनभर आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली काल दिली. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का बसला असून शिवसेना फुटीच्या मार्गावर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
2) एकनाथ शिंदे सुरतला -विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस समोर आली. नेते एकनाथ शिंदे सोमवार सायंकाळपासून नॉट रिचेबल होते. त्यांच्यासोबत 25 पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली. सर्वजण सुरतच्या एका हॉटेलमध्ये सर्व जण असल्याची माहिती मिळाली. हॉटेलमधील सर्व खोल्या बूक होत्या. हॉटेलमध्ये कोणीही जाऊ नये यासाठी हॉटेलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्या ठिकाणी कोणालाही जाऊ दिले नाही. महाराष्ट्रातील राजकीय भुकंपाचे नवे केंद्र आता सुरतचे ते हाॅटेल झाले होते. सविस्तर वाचा..
3) तीन प्रमुख आमदारांची मध्यस्थी - राज्यातील राजकारण ढवळून निघाले. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या तीन प्रमुख आमदारांनी मध्यस्थीची भूमिका निभावत वर्षावरील बैठकीला उपस्थिती लावली. यात चर्चेसाठी शिवसेनेच्या वतीने मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक उपस्थित होते. तर, एकनाथ शिंदेच्या वतीने दादा भुसे, संजय राठोड, संतोष बांगर हे आमदार बैठकीला उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे, एकनाथ शिंदेच्या वतीने मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तीन आमदारांनापैकी संजय राठोड यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली. सविस्तर वाचा..
4) शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर शिंदे भेट - शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवी पाठक सुरतमधील ली मेरिडियन हॉटेलमध्ये पोहचले जेथे काही शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते थांबलेले होते. ( Milind Narvekar Going Meet Eknath Shinde )
5) शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी काल ( मंगळवारी ) अचानक समर्थक आमदारांसह सूरत गाठून मोठा राजकीय स्फोट घडवला. त्यानंतर सकाळपासून सुरू झालेले राजकारण जगजाहीर आहे. मात्र, त्यांच्या राजकीय बंडानंतर मुंबईतील शिवसेना भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. शिवाय शिवसैनिकांकडून घोषणाबाजी झाली. सविस्तर चर्चा..
6) हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा, शरद पवारांची प्रतिक्रिया -एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये तळ ठोकल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. त्यातच काल राज्यातील महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्ली येथे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक बोलावली होती. मात्र, राज्यातील घडामोडी पाहता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंचा मुद्दा हा शिवसेनेचा अंतर्गत असल्याचे त्यांनी म्हटले. तर यावेळी पत्रकारांनी त्यांना आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपासोबत जाणार का? असा प्रश्न केला. यावेळी शरद पवारांनी उत्तर देत सांगितले की, राष्ट्रवादी विरोधात बसेल. सविस्तर वाचा..
7) कट्टर शिवसैनिक अजय चौधरी गटनेतेपदी -शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून तात्काळ उचलबांगडी ( Shinde Fired From Group Post ) केली. परळ - शिवडीमधील कट्टर शिवसैनिक आणि आमदार अजय चौधरी यांची काल गटनेतापदी वर्णी लागली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना या संदर्भातील पत्र काल देण्यात आले होते. सविस्तर वाचा..
8) हे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र, संजय राऊत यांची प्रतिक्रिया - राज्यात राजकीय भुकंपाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर संजय राऊत ( Sunjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, हे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे, ऑपरेशन लोटससाठी हा प्रकार यांनी सुरू केला आहे. आमच्या आमदारांचे अपहरण करून पोलिसांच्या गराड्यात ठेवण्यात आले. यातून सुटका करून घेणाऱ्या आमदारांवर हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, यातून शिवसेना बाहेर पडेल. कोणी कितीही म्हटले तरी संघटनेला तडा गेलेला नाही. आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला. एकनाथ शिंदे आमचे सहकारी आहेत, गेली अनेक वर्षे आम्ही सोबत काम करतो. त्यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर होऊ शकतात. त्यामुळे, मुंबईला येऊन त्यांनी आमच्यासोबत चर्चा करण्याचा आम्ही आवाहन केले आहे. तिथे जाऊन चर्चा करणे हे शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही. आमदारांच्या कुटुंबीयांनी तक्रारी दाखल केल्या आहेत, असे संजय राऊत ( MP Sanjay Raut about Eknath shinde ) म्हणाले होते. सविस्तर वाचा..
9) कुठलेही भाष्य करू इच्छित नाही, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया -शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. शिवसेनेचा एक गट नाराज असल्याने ते शिवसेनेपासून दूर गेले आहेत. मात्र, सध्या आम्ही यावर कुठलेही भाष्य करू इच्छित नाही. परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर आम्ही आमचे मत व्यक्त करू. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा हा अंतर्गत विषय असल्याने आम्ही आता अधिक बोलू शकत नाही. मात्र, अद्याप सरकार सादर करण्याची कुठलीही तयारी भाजपकडून नसल्याचे देखील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा..
10) फोनवरून मुख्यमंत्र्यांशी संवाद - मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी प्रथम चर्चा केली. त्यानंतर आपल्याच फोनवरून उद्धव ठाकरे यांना फोन लावत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद करून दिला. यावेळी एकनाथ शिंदे बरेच संतापले होते,क असे सुत्रांचे म्हणणे आहे. शिंदे यावेळी मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, एकीककडे मला गटनेतापदावरून काढले, का? आमदारांच्या अपहरणाचा आरोपही केला, त्याचवेळी चर्चाही करत आहात, असे का? एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना म्हणाले, संजय राऊत माझ्यासोबत फोनवर बोलताना खूप चांगले बोलतात. मग माध्यमांसमोर मात्र माझ्याविरोधात कसं काय बोलू शकतात. संजय राऊत यांच्या वागण्याबोलण्यावर शिंदे नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हिंदुत्वाच्या मुद्याच्या आधारे शिवसेना आणि भाजपची युती व्हायला हवी, अशी स्पष्ट भूमिका एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली, असे सुत्रांनी सांगितले. दोन्ही नेत्यांचा फोनवरील संवाद संपल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक लगोलग मुंबईकडे रवाना झाले होते. सविस्तर वाचा..
11) भाजपासोबत सरकार स्थापन करण्याचे आवाहन - सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपासोबत सरकार स्थापन करा आणि मला उपमुख्यमंत्री पद द्या. अन्यथा तुमचे तुम्ही पहा, आमचे आम्ही पाहतो, असा प्रस्ताव एकनाथ शिंदेंनी शिवसेनाला दिला आहे, अशी माहिती समोर आली. वाचा सविस्तर..
12) आज कॅबिनेटची बैठक - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्य सरकार गोत्यात आले आहे. मात्र, उलथापालथ ऐवजी आघाडी सरकार मजबूत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज कॅबिनेट बैठक बोलावली असून या बैठकीला कोण मंत्री उपस्थित राहणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर..
13) भाजपने कमी त्रास दिला का? -भाजप सोबत जुळवून घेण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या एकनाथ शिंदे यांना, मागील पाच वर्षांत भाजपने कमी त्रास दिला का? अशी आठवण मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करून ( Uddhav Thackeray replied Eknath Shinde praposal ) दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत आहे. तुम्ही घाबरू नका, असा विश्वास ठाकरे यांनी शिंदे यांना दिल्याची माहिती मिळत मिळाली. सविस्तर वाचा..
14) सर्व उर्वरित आमदार आता मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये - शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बंडाच्या पवित्रामुळे महाविकास आघाडी धोक्यात आली. शिवसेनेचे जवळपास 34 आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठले. त्यामुळे, शिवसेनेची सत्ता जाणार का? अशी स्थिती निर्माण झालेली असताना हातातली सत्ता वाचवण्यासाठी शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेने आपले सर्व उर्वरित आमदार आता मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये ठेवले आहेत. सविस्तर वाचा..
15) बंडखोर आमदारांना गुवाहाटीला नेणार असल्याचे समजले - काल रात्री उशीरा पर्यंत नाट्य पहायला मिळाले. बंडखोर आमदारांना गुवाहाटीला नेणार असे सांगण्यात येत होते. रात्री १० वाजल्यापासून सुरत येथील हाॅटेल परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात रात्री दोन वाजून १५ मिनटाच्या सुमारास बसेस सुरत हाॅटेल मधून रवाना झाल्या. दरम्यान हाॅटेलमधून बाहेर पडण्यापूर्वी सर्व बंडखोर आमदारांचा एक फोटो बाहेर आला, तो विमानतळाकडे निघण्यापूर्वीचा होता. त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्ताने या सगळ्या बस रवाना झाल्या. तेथून चार्टर्ड प्लेनने त्यांना गुवाहटीला नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. सविस्तर वाचा..
16) आसामला जाण्यासाठी सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले -शिवसेना नेते एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ३४ आमदारांसोबतच ७ अपक्ष, अशा एकूण ४१ आमदारांसह गुवाहाटी, आसामला जाण्यासाठी सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. ते जे सुरतमधील ली मेरिडियन हॉटेलमध्ये थांबले होते. दिवसभराच्या नाट्यमय घडामोडी नंंतर काय होणार तोडगा निघणार का असे प्रश्न निर्माण झाले होते. रात्री या आमदारांना सुरत येथून नेमके कोठे पाठवले जाणार, या बद्दल साशंकता होती. पण, रात्री उशीरा त्यांना गुवाहाटी आसाम येथे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच, रात्री उशीरा सुरतमधील ली मेरिडियन हॉटेलमधून गुवाहाटी, आसामला जाण्यासाठी सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. सुरत ते गुवाहाटी हे हवाई अंतर साधारण ३ ते ३.३० तासांचे आहे. सविस्तर वाचा..
17) बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोडणार नाही -बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही सोडलेली नाही आणि सोडणार नाही. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा पाठपुरावा करत आलो आहोत आणि पुढेही चालवू, असे मत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुजरातमधील सुरत विमानतळावर बोलताना व्यक्त केला आहे. राज्यात दिवसभर चाललेल्या राजकीय नाट्यानंतर रात्री उशिरा सोबतच्या आमदारांना घेऊन शिंदे सुरत विमानतळावरून रवाना झाले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली. सविस्तर वाचा..
18) दोन आमदार केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर -केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असलेले शिवसेनेचे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंतराव जाधव यांची पत्नी यामिनी जाधव आणि प्रताप सरनाईक हे देखील बंडखोर आमदारांच्या यादीत आहेत. सविस्तर वाचा..
19) शिंदे आमचे सहकारी, त्यांची वाट पाहात आहोत, राऊतांची प्रतिक्रिया -एकनाथ शिंदे आमचे सहकारी आहेत. आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. एकनाथ शिंदे ( Sanjay Raut on eknath shinde ) सर्व आमदारांसह परत येतील, अशी आपल्याला खात्री असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on eknath shinde ) म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक काल सायंकाळी वर्षा निवासस्थानी बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना साद घातली. सविस्तर वाचा..
20) बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे आसामध्ये- शिवसेनेत बंडखोरी करून आपल्या समर्थक आमदारांसह नाराज असलेले मंत्री एकनाथ शिंदे हे आसामची राजधानी गुवाहाटी येथे दाखल झाले ( Eknath Shinde arrives in Guwahati ) आहेत. तेथे एका हॉटेलमध्ये या सर्व आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुवाहाटी विमानतळावर पोहचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत गुवाहाटीमध्ये दाखल झाले असल्याचे ते म्हणाले. तसेच, मी कुणावरही टीकाटिप्पणी करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्त्व आम्ही पुढे घेऊन जाणार, असे शिंदे ( Eknath Shinde Claims ) म्हणाले. सविस्तर वाचा..