महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde : एकनाथ शिंंदेंनी फडणवीसांचे मानले आभार तर शिवसेनेवर सोडला बाण - महाविकास आघाडी सरकार

भाजपाकडे मोठ्या प्रमाणात संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला, आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. आम्ही फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेवर आरोपही केले. ( Eknath Shinde allegations on shiv sena )

Eknath Shinde
एकनाथ शिंंदे

By

Published : Jun 30, 2022, 5:53 PM IST

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुंख्यमंत्री होणार असल्याचे घोषित केले. तसेच आपण शिंदे गटाला बाहेरुन पाठिंबा देणार आहेत. आघाडी सरकारमध्ये कामे होत नव्हती. बाळासाहेबांचे विचार योग्य पद्धतीने पुढे घेऊन जाता येत नव्हते. आमदारांना योग्य प्रमाणात निधी दिला जात नव्हता. शिवसेना आमदारांकडून हारलेल्या आमदारांना मोठ्या प्रमाणात स्थान दिल्या जात होते. असे आरोप आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची एकनाथ शिंदे यांनी केले. देवेंद्र फडणवीस स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. भाजप एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देणार आहे. ( Eknath Shinde allegations on shiv sena )

एकनाथ शिंदे यांचे पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला - भाजपाकडे मोठ्या प्रमाणात संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला, आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. आम्ही फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे सांगितले.

फडणवीसांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही -पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, "या संबंधी भाजपने आम्हाला साथ दिली, संख्याबळानुसार त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा न लावता बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिले. हा देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस आमच्या पाठिशी आहे. ते मंत्रिमंडळात नसले तरी ते राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. "

एकनाथ शिंदे यांचे आरोप - "राज्याचा विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास हा अजेंडा म्हणून आम्ही पुढे निघालो आहोत. एक वैचारिक भूमिका घेऊन आम्ही जात आहोत. गेल्या काही काळांमध्ये आम्ही उद्धव ठाकरेंना आमच्या मतदारसंघातील अडचणींची माहिती दिली, त्यामध्ये सुधारणा व्हावी अशी मागणी केली. पुढच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणे याचाही विचार आम्ही केला. राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक गोष्टी होत्या, महाविकास आघाडीमध्ये त्यावर निर्णय घेता येत नव्हते. पक्षाचे 50 आमदार ज्यावेळी वेगळी भूमिका घेतात, त्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज होती." बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन 50 आमदारानी वेगळी भूमिका घेतली, त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही. हे सरकार लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यास कटीबद्ध आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांची केली घोषणा -भाजपने निर्णय घेतलाय की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही आहोत. कुठल्यातरी मुख्यमंत्रीपदाकरता आम्ही काम करत नाहीयत. ही तत्त्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. ही विचारांची लढाई आहे. म्हणून भाजपने निर्णय घेतलाय की, एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी होईल. लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. यामध्ये शिवसेना आणि भाजपचे आमदार येतील. मी स्वत: बाहेर असेन, पण हे सरकार चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी असेल", अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा - Eknath Shinde CM : 'फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक'; एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details