महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण : एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात

आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्या तपास यंत्रणेत पूर्ण सहकार्य करतील, अशी माहिती मंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन तळेकर यांनी दिली.

Mandakini Khadse
Mandakini Khadse

By

Published : Oct 19, 2021, 11:29 AM IST

मुंबई - भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्या ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. मात्र ईडीचे कार्यालय बंद असल्याने त्यांनी परत जावे लागले. पण त्या पुन्हा येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्या तपास यंत्रणेत पूर्ण सहकार्य करतील, अशी माहिती मंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन तळेकर यांनी दिली.

मंदाकिनी खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात

तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे न्यायालयाचे निर्देश -

पुण्यातील भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले असता त्यांनी त्या विरोधात मुंबईच्या सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, सत्र न्यायालयाकडून मंदाकिनी खडसे यांना दिलासा मिळाला नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणाची सुनावणी करताना मंदाकिनी खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. त्यांना तूर्तास अटक करू नये, असे निर्देष न्यायालयाने ईडीला दिले होता.

काय आहे प्रकरण? -

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

हेही वाचा -सत्ता गेल्यानंतर काहींना भ्रमिष्टपणा येतो तर काहींचा तोल जातो, जयंत पाटलांचा चद्रकांत पाटलांना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details